IND vs ENG T20: नेदरलँडच्या जीवावर पाकिस्तानची (Pakistan) टीम सेमीफायनलला गेली आणि सेमीफायनलमध्ये तगड्या न्यूझीलंडचा (Pak vs Nz) पराभव करत फायनलसाठी मेलबर्नचं तिकीट कन्फर्म केलंय. अशातच आता दुसरा सेमीफायनल सामना भारत आणि इंग्लंड (IND vs ENG 1st Semi-Final) यांच्यात खेळला जाणार आहे. त्यासाठी आता दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. अशातच आता फायनलला कोणता संघ भारताशी भिडणार, असा सवाल विचारला जात असतानाच पाकिस्तानचा स्टार खेळाजू मोहम्मद रिझवानने (Mohammad Rizwan) मोठं वक्तव्य केलं आहे.


काय म्हणाला रिझवान ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आम्ही वर्ल्ड कपचा (T20 World Cup) पहिला सामना भारताविरुद्ध गमावला. आता आम्ही फायलनमध्ये (Final) पोहोचलोय. आता भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये दुसरा सेमीफायनलचा सामना होणार आहे. आपल्या सर्वांना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया (ENG vs AUS) यांच्यामधील अॅशेल मालिका सर्वांना आवडते. पण त्यापेक्षा जास्त भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामने क्रिकेट विश्वाला जास्त आवडतात. त्यामुळे चाहत्यांना नक्कीच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहायला सर्वांना आवडेल, असं रिझवान (Mohammad Rizwan) म्हणाला आहे.


रिझवान प्रश्नाचं उत्तर टाळत असल्याचं दिसल्यावर त्याला त्याचं मत विचारण्यात आलं. त्यावर, तुम्ही मला विचाराल तर या प्रश्नाचं उत्तर देणं सर्वात अवघड आहे. पण भारताबरोबर सामना झाला तर तो रोमांचक होऊ शकतो. भारत फायनलमध्ये आला तर आमचं काय होईल किंवा त्यांचं काय होईल, हे आता सांगता येणार नाही. पण हा सामना नक्कीच चांगला होईल, अशी आशा रिझवानने (Mohammad Rizwan) व्यक्त केली आहे.


आणखी वाचा - T20 World Cup: पुन्हा रंगणार 'IND vs PAK' सामना? 15 वर्षानंतर इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?


दरम्यान, भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात अॅडलेटच्या मैदानावर सेमीफायनल सामना खेळवला जाईल. हा सामना जिंकून पाकिस्तानशी दोन हात करण्यासाठी भारत संघ मैदानात घाम गाळताना दिसत आहे. त्यामुळे आता भारत आणि पाकिस्तानच नाही तर संपुर्ण जगभरातील क्रिकेट चाहत्यांचं लक्ष उद्याच्या सेमीफायनल सामन्यावर आहे.