T20 World Cup: पुन्हा रंगणार 'IND vs PAK' सामना? 15 वर्षानंतर इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?

Pakistan beat New Zealand in 1st Semi-Final : भारताचा नवा कोरा कॅप्टन धोनीने (MS Dhoni) आपल्या सवंगड्यांसह वर्ल्ड कप घरी आणला होता. त्यामुळे पाकिस्तानची जगभर नाचक्की झाली. तो सामना खास राहिला पाकिस्तानच्या पराभवामुळे... 

Updated: Nov 9, 2022, 05:39 PM IST
T20 World Cup: पुन्हा रंगणार 'IND vs PAK' सामना? 15 वर्षानंतर इतिहासाची पुनरावृत्ती होणार का? title=
T20 World Cup IND vs PAK

IND vs PAK final : अखेरची ओव्हर होती...पाकिस्तानला जिंकण्यासाठी 6 धावांची गरज होती. भारताचा स्टार गोलंदाज जोगिंदर शर्मा (Joginder Sharma) बॉल टाकण्यासाठी तयार होता. एक मोठा शॉट आणि भारताचा पराभव निश्चित... त्यावेळी मैदानावर पाकिस्तानचा कॅप्टन मिस्बाह उल हक (Misbah-ul-Haq) आणि मोहम्मद आसिफ (Mohammad Asif) पाय रोवून उभे होते. भारताला फक्त एका विकेटची गरज होती. त्यावेळी श्रीसंतने (Sreesanth) एक भन्नाट कॅच पकडला आणि सामन्याचा पारडं फिरलं. भारताने पाकिस्तानचा (India Beat Pakistan 2007 T20WC) पराभव करत वर्ल्ड कप जिंकला होता. भारतात दिवाळी साजरी करण्यात आली.

भारताचा नवा कोरा कॅप्टन धोनीने (MS Dhoni) आपल्या सवंगड्यांसह वर्ल्ड कप घरी आणला होता. त्यामुळे पाकिस्तानची जगभर नाचक्की झाली. तो सामना खास राहिला पाकिस्तानच्या पराभवामुळे... अशीच संधी पुन्हा टीम इंडियाच्या पदरी पडली आहे. सध्या सुरू असलेल्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानने न्यूझीलंडला घरचा रस्ता दाखवला आहे. त्यामुळे फायनलमध्ये पुन्हा भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK T20 Final) आमने सामने येण्याची शक्यता आहे.

Ind vs Eng 2nd Semi-final: भारताविरुद्ध सामन्याआधी बटलरला आलं टेन्शन; वाचा नेमकं कारण काय?

न्यूझीलंड आणि पाकिस्तान (Pak Vs Nz 1st Semi-Final) यांच्यात झालेल्या सामन्यात पाकिस्तानने 7 विकेट राखून विजय मिळवला. न्यूझीलंडने पाकिस्तानला 153 रन्सचं आव्हान दिलं होतं. या विजयामुळे टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात पाकिस्तानने तिसऱ्यांदा फायनलपर्यंत (Pakistan in Final) मजल मारली आहे. याआधी पाकिस्तानने 2009 मध्ये फायनल गाठली होती.

Pak Vs Nz Semi-Final : पाकिस्तानला फायनलचं तिकीट, न्यूझीलंडचं वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न पुन्हा भंगलं

दरम्यान, पाकिस्तानशी पुन्हा भिडण्यासाठी भारताचा इंग्लंडचा दगड रस्त्यातून बाजूला करावा लागणार आहे. इंग्लंडला पाणी पाजल्यानंतर भारताला पुन्हा पाकिस्तानशी दोन हात करण्यास मिळेल. त्यामुळे आता रोहितसेना दुधारी तलवारी घेऊन सज्ज झाली आहे. त्यामुळे आता T20 World Cup 2022 ची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.