Rohit Sharma On No 4 Batting Position: आगामी आशिया कप स्पर्धेसाठी (Asia Cup 2023) आता टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे. चीफ सिलेक्टर अजित आगरकर (Ajit Agarkar) आणि टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनी भारतीय संघाची घोषणा केली. त्यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. पत्रकार परिषदेत ज्यावेळी रोहित शर्माला चौथ्या क्रमांकावर प्रश्न विचारला गेला. त्यावेळी हसत रोहितने उत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, रोहितने स्पष्ट उत्तर दिलं नाही. त्यामुळे आता क्रिडाविश्वास नाराजीचं वातावरण आहे. वर्ल्ड कप तोंडावर असताना नंबर 4 वर कोण खेळणार हे स्पष्ट नसल्याने आता विराट कोहलीसह इतर खेळाडूंचं टेन्शन वाढलंय.


नेमकं काय म्हणाला रोहित शर्मा?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमच्याकडे चौथ्या क्रमाकावर खेळणारे खेळाडू आहेत. चौथ्या क्रमांकाची जागा आव्हानात्मक असणार आहे. या जागेवर खेळणाऱ्या खेळाडूवर प्रेशर असतो.  ही एक जागा आमच्यासाठी आव्हान आहे.  दुर्दैवाने दुखापतींमुळे आम्हाला इतर खेळाडूंचा प्रयत्न करावा लागला होता. डावखुरा म्हणून आम्ही चौथ्या क्रमांकावर अक्षरचा प्रयत्न केला होता. त्याला मुक्तपणे खेळण्याची संधी दिली होती, असं रोहित शर्मा म्हणतो. रोहितने पत्रकार परिषदेत नंबर 4 वर स्पष्टपणे बोलण्याचं टाळलं. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर, सिलेक्टर्सने अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे आता क्रिडाविश्वास आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.


चौथ्या क्रमांकासाठी पर्याय काय?


श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांची श्रीलंकेत आगामी एशिया कपसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. तर तिलक वर्माला देखील संधी देण्यात आली आहे. राहुल आणि अय्यर दोन्ही फलंदाज दीर्घकालीन दुखापतींमधून बरे होत होते आणि बर्‍याच काळासाठी मैदानाबाहेर होते. परंतु विश्वचषक दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत येत असल्याने, भारताच्या मधल्या फळीला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. मात्र, जेव्हा रोहित शर्माला विचारलं गेलं. तेव्हा त्याने डावखुऱ्या फलंदाजीचा पर्याय सांगितला. त्यामुळे आता आगामी काळात तिलक वर्मा 4 थ्या क्रमांकावर दिसण्याची शक्यता आहे. टिळक वर्मा आशावादी आहेत, त्यांच्यासाठी हे एक मोठे प्रदर्शन असेल, असं अजित आगरकर म्हणाले आहेत.



कोणत्या खेळाडूंना संधी?


आशिया कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा,  केएल राहुल,  ईशान किशन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.


राखीव खेळाडू : संजू सॅमसन (राखीव विकेटकीपर)


एशिया कपचं शेड्यूल (Asia Cup schedule)


पाकिस्तान विरुद्ध नेपाळ - 30 ऑगस्ट
बांगलादेश विरुद्ध श्रीलंका - 31 ऑगस्ट
भारत विरुद्ध पाकिस्तान - 2 सप्टेंबर
बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान - 3 सप्टेंबर
भारत विरुद्ध नेपाळ - 4 सप्टेंबर
श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान - 5 सप्टेंबर