IND vs ENG Test : भारत आणि इंग्लंड यांच्यात राजकोटच्या (Rajkot Test) निरंजन शहा क्रिकेट स्टेडियमवर चौथा कसोटी सामना खेळला गेला. या सामन्यात यशस्वी जयस्वालने उल्लेखनीय कामगिरी केली. तर रोहित शर्मा आणि रविंद्र जडेजा यांनी देखील शतक ठोकून टीम इंडियाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तर गोलंदाजीमध्ये देखील रविंद्र जडेजाने (Ravindra Jadeja) भेदक कामगिरी केली. त्यामुळे त्याला प्लेयर ऑफ द मॅच पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं. सामना संपल्यानंतर रविंद्र जडेजाने रोजकोटच्या खेळपट्टीचं चुंबन घेतलं. जडेजाने  कधी नव्हे ते असं का केलं? असा सवाल विचारला जातोय. त्यावर आधारित एक व्हिडीओ (Viral Video) आता समोर आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाच्या पहिल्या डावात भारताची परिस्थिती बिकट झाली होती. 33 धावांवर 3 गडी बाद अशी स्थिती असताना रविंद्र जडेजाने रोहित शर्मासोबत संयमी खेळी केली अन् शतक ठोकलं. त्यामुळे टीम इंडियाला 400 हून अधिक धावा करता आल्या आहेत. तर दुसऱ्या डावात गोलंदाजीमध्ये जड्डूने 5 विकेट्स खोलल्या. त्यामुळे इंग्लंडचा डाव 150 च्या आतच गुंडाळला गेला. यशस्वी जयस्वालने जरी नाव कमावलं असलं तरी रविंद्र जडेजाच्या ऑलराऊड कामगिरीमुळे टीम इंडियाचा विजय सोपा झाला होता. मात्र, जड्डूने खेळपट्टीचं चुंबन का घेतलं? याचं खरं कारण सांगणारा एक व्हिडीओ समोर आला आहे.


काही वर्षापूर्वी जडेजाने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये, त्याला एक प्रश्न विचारण्यात आला होता. आता आयुष्यात काय पाहिजे? असं जडेजाला विचारल्यावर जड्डूने दिलखुलास उत्तर दिलं. टेस्ट क्रिकेटच्या डावात शतक आणि 5 विकेट्स घेण्याचं माझं स्वप्न आहे, असं जडेजाने मुलाखतीमध्ये बोलून दाखवलं होतं. आता हेच स्वप्न जडेजाने मेहनतीच्या जोरावर पूर्ण केलंय. सामन्यातील अफलातून कामगिरीचं श्रेय त्याने आपली पत्नी रिवाबाला दिल्याने त्याच्यावर टीका देखील झाली होती.


पाहा Video


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by  (@thestareditss1845)


दरम्यान, एका कसोटीत शतक आणि डावात पाच विकेट घेण्याची कामगिरी जडेजाने दुसऱ्यांदा केली आहे. जड्डूने 2022 मध्ये मोहाली कसोटीत श्रीलंकेविरुद्ध नाबाद 175 धावांची खेळी केली होती. तर त्याच सामन्यात त्याने 5 विकेट्स घेतल्या होत्या. एकाच डावात शतक आणि पाच विकेट्स घेण्याची कामगिरी करणारा जडेजा चौथा ऑलराऊंडर भारतीय ठरला आहे. याआधी रविंद्रचंद्रन आश्विन, विनू मंकड आणि पॉली उम्रीगर यांनी अशी कामगिरी केली आहे.