Sanju Samson News : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-ट्वेंटी मालिकेसाठी (IND vs AUS T20I Series) बीसीसीआयने नुकताच आपला संघ जाहीर केला. त्यानुसार, सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याच्याकडे कर्णधारपद, तर ऋतुराज गायकवाड याच्याकडे उपकर्णधारपद देण्यात आलं आहे. त्याचबरोबर रिंकू सिंग, जितेश शर्मा, मुकेश कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान या सारख्या युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. मात्र, टीम इंडियाचा तडाकेबाज फलंदाज संजू सॅमसनला (Sanju Samson) पुन्हा एकदा डावलण्यात आलं आहे. त्यामुळे आता बीसीसीआयने (BCCI) संजूला रेड अलर्ट दिलाय का? असा सवाल विचारला जातोय.


संजू सॅमसनचं करियर संपलं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आशिया कपमध्ये संजूला संधी मिळेल, अशी चर्चा होती. मात्र, त्याला संधी मिळाली नाही. त्यानंतर एशियन गेम्स आणि वर्ल्ड कपमधून देखील संजूला बाहेर ठेवण्यात आलं होतं. तर आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-ट्वेंटी मालिकेसाठी त्याला डावलल्यात आलं आहे. ऑर्यलँडविरुद्ध संजूला संधी देण्यात आली होती. मात्र, त्यानंतर त्याला स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली नाही.



कशी असेल टीम इंडिया?


सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जयस्वाल, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, मुकेश कुमार.


कसं असेल टीम इंडियाचं शेड्यूल?


पहिला टी-20 सामना - 23 नोव्हेंबर - विशाखापट्टणम
दुसरा टी-20 सामना - 26 नोव्हेंबर - तिरुवनंतपुरम
तिसरा टी-20 सामना - 28 नोव्हेंबर - गुवाहाटी
चौथा टी-20 सामना - 1  डिसेंबर - रायपूर
पाचवा टी-20 सामना - 3  डिसेंबर - बंगळुरू


भुवनेश्वर कुमारला 'टाटा गुड बाय'


टीम इंडियाचा स्टार गोलंदाज भुवनेश्वर कुमार याला देखील नव्या छाव्यांच्या तुकडीमध्ये संधी मिळाली नाही. त्यामुळे आता भुवीला पुन्हा आयपीएलमध्ये चमक दाखवावी लागणार आहे. वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, आवेश खान आणि मुकेश कुमार यांच्या खांद्यावर गोलंदाजीची धुरा असणार आहे.