मुंबई : श्रीलंका दौऱ्यावर टीम इंडियाची चांगली कामगिरी आहे. कसोटी मालिकेत श्रीलंकेविरुद्ध ३-० ने निर्भेळ यश मिळवलेय. आता कोहली टीमचे लक्ष आहे ते एक दिवशीय मालिकेवर. कोहली कंपनीची कामगिरी पाहता २० वर्षांपूर्वीचा बदला विराट घेऊ शकतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसऱ्या बाजूला श्रीलंका संघ आहे. त्यांच्यावर सध्या स्वतःच्या घरात टीकेला सामोरे जावे लागत आहे. ते त्याचा सामना करत आहेत. कसोटी मालिका हरल्यानंतर माजी क्रिकेट खेळाडूंनी अशी हार याआधी मायदेशात पाहिलेली नाही, असे म्हटलेय. कधीही संघाची खराब स्थिती पाहिलेली नाही. कसोटी गमावल्यानंतर आता त्याला टीम इंडियात पाच एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. जर भारत या मालिकेत चांगली कामगिरी केली तर श्रीलंकेला त्याच्या देशात हरविण्याची किमया विराट कोहली सेना करु शकते. हा एक इतिहास घडू शकतो. 


पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताला क्लीन स्वीप करणे सोपे जाणार नाही.भारतीय संघाचा हा आठवा श्रीलंकेचा दौरा आहे आणि आजपर्यंत, टीम इंडिया श्रीलंकेतील एकदिवसीय मालिकेत क्लिन स्वीप करु शकलेली नाही. गेल्या काही वर्षांपासून भारताने श्रीलंकेमध्ये सातत्याने एकदिवसीय मालिका जिंकली आहे, परंतु तरीही टीम इंडिया क्लिन स्वीपच्या प्रतिक्षेत आहे. टीम इंडियाने १९९७ साली श्रीलंकेचा दौरा केला होता. या दौऱ्यात संघाला तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्याची संधी मिळाली. पहिल्या सामन्यात भारताने दोन धावांनी पराभव पत्करावा लागला होता. पण त्यानंतरचे दोन सामने सहज श्रीलंकेने जिंकले  आणि भारताचा सूपडा साफ केला होता.