लंडन : 'स्विस किंग' म्हणून ओळखला जाणारा  स्वीत्झर्लंडच्या रॉजर फेडररने स्पेनचा टेनिसस्टार राफेल नदालला नमवून विम्बल्डनच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. फेडरर १२ वेळा अंतिम फेरीत पोहोचला आहे. फेडररने नदालला १६ वेळा पराभूत केले आहे. आता तो अंतिम फेरीत नोव्हाक जोकोविचला पराभूत करणार का, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रॉजर आतापर्यंत तब्बल आठवेळा विम्बल्डन किताब पटकावले आहेत. त्यामुळे रॉजर पुन्हा एकदा जेतेपदासाठी सज्ज असेल. अंतिम फेरीत त्याची टक्कर जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला सर्बियाचा गतविजेता नोव्हाक जोकोविच याच्याशी होणार आहे. उपांत्य फेरीसाठी सेंटर कोर्टवर झालेल्या अत्यंत चुरशीच्या लढतीत फेडररने नदालचा ७-६, १-६, ६-३, ६-४ असा पराभव केला. 



पहिल्या सेटमध्ये रॉजर फेडरर आणि नदाल यांनी एकदम कडवी लढत दिली. हा सेट फेडररने टाय ब्रेकमध्ये जिंकला. ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याची फेडररची ही ३१वी वेळ आहे. तर, विम्बल्डनच्या अंतिम फेरीत १२ व्या वेळी खेळणार आहे. ३७ वर्षीय फेडररने आतापर्यंत आठवेळा बिम्बल्डन जेतेपदावर आपले नाव कोरले आहे. 


रॉजर फेडररने एकूण २० ग्रँडस्लॅम सिंगल्सचे विजेतेपद जिंकले आहेत. हे सर्व पुरुष सिंगल्स ग्रँडस्लॅमचे शीर्षक आहेत. फेडरर हा अव्वल क्रमांकावर आहे. राफेल नडालने १८ आणि नोवाक जोकोविचने १५ जिंकले असून हे दोघे क्रमशः दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांक आहेत.


सेरेना विल्यम्स, सिमोना हॅलेप अंतिम फेरीत



Image Credits: Twitter/@Wimbledon


दरम्यान, महिला सिंगल्सचा विचार करता अमेरिकेच्या सेरेना विल्यम्स आणि रोमानियाच्या सिमोना हॅलेप यांनी अंतिम फेरीत धडक मारली आहे. सेरेना ओपन एरामध्ये सर्वाधिक २३ ग्रँडस्लॅम किताब जिंकले आहेत. तिने विम्बल्डनच्या अंतिम फेरीत ११ वेळा प्रवेश केला आहे. तिने गुरुवारी  सेमीफाइनलमध्ये चेक गणराज्यच्या बारबोरा स्ट्रायकोव्हाचा पराभव केला. सिमोना हालेप विम्बल्डनच्या फाइनलमध्ये पहिल्यांदा पोहोचली आहे. तिने सेमीफाइनलमध्ये यूक्रेनच्या एलिना स्वितोलिना हिचा पराभव केला.