Women`s T20 World Cup 2024: ऑस्ट्रेलिया विरुद्ध पराभव झाल्यास टीम इंडियाचं काय होणार? असं आहे सेमीफायनलचं समीकरण
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना टीम इंडियासाठी अत्यंत महत्वाचा असून यात विजय मिळवल्यास ते थेट सेमी फायनलमध्ये पोहोचू शकतात. मात्र जर ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकला तर त्यांच्या अडचणी वाढू शकतात.
IND VS AUS Womens T20 World Cup 2024 : सध्या यूएईमध्ये महिला टी 20 वर्ल्ड कप 2024 सुरु असून यात रविवारी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ग्रुप स्टेजचा सामना पार पडणार आहे. हा सामना टीम इंडियासाठी अत्यंत महत्वाचा असून यात विजय मिळवल्यास ते थेट सेमी फायनलमध्ये पोहोचू शकतात. मात्र जर ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकला तर त्यांच्या अडचणी वाढू शकतात. तेव्हा भारतीय महिला संघाचं सेमी फायनलमध्ये पोहोचण्याचं समीकरण कसं असेल याबाबत जाणून घेऊयात.
महिला टी 20 वर्ल्ड कप 2024 च्या ग्रुप स्टेज सामन्यात टीम इंडिया ग्रुप ए चा भाग आहे. ग्रुप ए च्या पॉईंट्स टेबलमध्ये ऑस्ट्रेलिया टॉपवर असून त्यांनी आतापर्यंत तीन पैकी तीन सामने जिंकले आहेत. त्यांच्याकडे सध्या 6 पॉईंट्स आहेत. जर ऑस्ट्रेलियाने भारताला हरवलं तर ते थेट सेमी फायनलमध्ये पोहोचतील. टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या सामन्यात त्यांच्यावर मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. यामुळे टीम इंडियाचा नेट रनरेट हा ऑस्ट्रेलियापेक्षा चांगला होईल. भारताकडे आता 4 पॉईंट्स आहेत.
ऑस्ट्रेलियाने भारताला हरवलं तर काय होईल?
ऑस्ट्रेलिया पराभूत झाल्यास टीम इंडियाचं टेन्शन वाढेल. अशा स्थितीत भारताला सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान यांच्या सामन्यावर अवलंबून रहावं लागेल.भारताला प्रार्थना करावी लागेल की पाकिस्तानने न्यूझीलंडला हरवावे. तर न्यूझीलंडचे दोन सामने अजून बाकी आहेत. त्यामुळे त्यांच्या खात्यात सध्या दोन 2 पॉईंट्स असून त्यांचा नेट रनरेटही मायनसमध्ये आहे. पाकिस्तानचा शेवटचा सामना शिल्लक असून त्यांचेही फक्त 2 पॉईंट्स आहेत. श्रीलंकेचा संघ आधीच बाहेर पडला आहे.
हेही वाचा : IND VS NZ Test : रोहित शर्माचा वारसदार अन् कसोटी संघाचा नवा कर्णधार सापडला? BCCI कडून सूचक संकेत
टीम इंडियासाठी विजयासोबत नेट रनरेटही महत्वाचा :
टीम इंडियाला फक्त ऑस्ट्रेलियाला हरवायचेच नाही तर त्यांच्या विरुद्ध जास्त फरकाने विजयही मिळवायचा आहे. भारताला विजयासह ऑस्ट्रेलियाचा नेट रनरेट पार करावा लागेल. म्हणून टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध मोठा विजय नोंदवावा लागेल. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने आतापर्यंत टी 20 वर्ल्ड कप 2024 मध्ये चांगली कामगिरी केली असून पहिला सामना वगळता इतर सर्व ग्रुप स्टेज सामने टीम इंडियाने जिंकले आहेत.