World Cup 2023 Final Suryakumar Slow Innings Slams Rohit Sharma: वर्ल्ड कप 2023 चा अंतिम सामन्यात भारतीय संघ का पराभूत झाला यासंदर्भातील विश्लेषणांना उधाण आलं आहे. सलग 10 सामने जिंकणाऱ्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात कच खाल्ली. अनेक माजी क्रिकेटपटूंनी या सामन्याबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे. यामध्ये रिकी पॉण्टींग, नासिर हुसैन, हरभजन सिंग यासारख्या खेळाडूंनी खेळपट्टीला दोष दिला आहे. तर सुनील गावसकर आणि विरेंद्र सेहवाग यांनी के. एल. राहुल आणि विराट कोहलीने केलेली 67 धावांची पार्टनरशीप कारणीभूत ठरल्याचं म्हटलं. मात्र आता गौतम गंभीर आणि वसिम अक्रम यांनी भारताच्या पराभवाचं कारणाबद्दल बोलताना रोहित शर्माच्या निर्णयांवर टीका केली आहे. सूर्यकुमार यादवच्या 28 बॉलमध्ये 18 रनच्या खेळीवरुन रोहित शर्माला बोलणी खावी लागल्याचं दिसत आहे.


सहाव्या क्रमांकावर आला जडेजा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अहमदाबादच्या मैदानावर ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने विराट कोहलीला बाद केलं. यानंतर सहाव्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव फलंदाजीला येणं अपेक्षित होतं. मात्र सहाव्या क्रमांकावर डावखुरा फलंदाज रविंद्र जडेजा फलंदाजीसाठी आला. हार्दिक पंड्या दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर पडल्यामुळे त्याच्या जागी रविंद्र जडेजाला प्रमोट करण्यात आलं. स्पोर्ट्स किडाशी बोलताना गौतम गंभीर आणि वसिम अक्रम यांनी जडेजाला आधी फलंदाजीला पाठवण्याच्या निर्णयाबद्दल आश्चर्य व्यक्त केलं आहे. 


नक्की पाहा >> 'कितने भी दुख आएं, कितने भी...'; भारत World Cup हरल्यानंतर शमीच्या पत्नीची प्रतिक्रिया! पाहा Video


सूर्यकुमार यादववर विश्वास नाही का?


"जडेजाला सूर्यकुमारच्या आधी का पाठवलं मला कळलं नाही. सूर्यकुमारला सातव्या क्रमांकावर का पाठवलं? हा कोणत्याही दृष्टीने योग्य निर्णय नव्हता," असं गौतम गंभीरने म्हटलं आहे. "सूर्यकुमार यादव हा पूर्णवेळ फलंदाज आहे. जर हार्दिक पंड्या संघात असता तर मी समजू शकतो," असं वसिम अक्रमने म्हटलं. गौतम गंभीरने भारतीय संघ व्यवस्थापनाला सूर्यकुमार यादवच्या क्षमतेवर विश्वास नाही का असा प्रश्नही उपस्थित केला आहे. सूर्यकुमार सहाव्या क्रमांकावर उत्तम खेळू शकतो यावर विश्वास नाही का? असं विचारतानाच सूर्यकुमार वरच्या क्रमांकावर म्हणजेच 6 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला असता तर तो आक्रमक पद्धतीने खेळला असता. तळाला फलंदाज नाहीत याचा विचार करुन सूर्यकुमारला सावध खेळी करावी लागली, असंही गंभीर म्हणाला.


नक्की वाचा >> 'मला कळत नाही की विकेट्सची गरज असताना रोहितने...'; WC Final नंतर माजी कर्णधाराला पडला प्रश्न


सूर्यकुमारच्या खेळीसाठी रोहितवर साधला निशाणा


सूर्यकुमार यादवला खालच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवल्याचा दोष रोहित शर्माला देत गंभीरने सूर्यकुमार सहाव्या क्रमांकावर आला असता तर काय झालं असतं याबद्दलही भाष्य केलं. "विचार करा की के. एल. राहुल हा विराट कोहलीबरोबर संयमाने खेळी करत होता. त्यानंतर आक्रमक खेळी करण्यास सांगून सूर्यकुमारला फलंदाजीला पाठवलं असतं तर त्याने नैसर्गिक खेळ केला असता. कारण अशा स्थितीत तळाशी पडझड रोखण्यासाठी जडेजा उपलब्ध होता. सूर्यकुमार चाचपडत होता हे दिसत होते. मात्र त्यावेळी त्याचा विचार असा असेल की तो बाद झाल्यानंतर मोहम्मद शमी, जसप्रीत बुमार, सिराज आणि कुलदीप हे फलंदाजीसाठी येणार होते. मात्र पुढला फलंदाज जडेजा असता तर सूर्यकुमारची विचारसणी नक्कीच वेगळी असते. तुम्ही सहाव्या क्रमांकावर सूर्यकुमारसंदर्भात ठाम नव्हता तर दुसऱ्या खेळाडूला तुम्ही निवडायला हवं होतं," असं गंभीर म्हणाला