India Legend Explosive Tweet On Virat Kohli: वर्ल्ड कप 2023 मध्ये सध्या सर्वात यशस्वी फलंदाजांच्या यादीमध्ये विराट कोहलीचं नाव आवर्जून घेतलं जात आहे. विराट कोहली सध्याच्या घडीला वर्ल्ड कप 2023 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. केवळ 4 शतकं झळकावणारा क्विंटन डी कॉक हा विराटच्या पुढे आहे. कोहलीने वर्ल्ड कपमध्ये साखळी फेरीतील भारताचा शेवटचा सामना होण्याआधी 543 धावा पूर्ण केल्या आहेत. यामध्ये 2 शतकांचा आणि 4 अर्धशतकांचा समावेश आहे.


विराट स्वार्थी असल्याची टीका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहलीने एवढी उत्तम कामगदिरी केल्यानंतरनही अनेकजण त्यांच्यावर खोचक शब्दांमध्ये टीका करत आहेत. विराट कोहली हा स्वार्थी असून तो त्याच्या वैयक्तिक विक्रमांना सांघिक कामगिरीपेक्षा अधिक प्रधान्य देतो अशी टीका अनेकांनी केली आहे. केवळ चाहतेच नाही तर काही माजी क्रिकेटपटूंनीही अशीच टीका केली असून यामध्ये पाकिस्तानच्या मोहम्मद हाफीजचाही समावेश आहे. हाफीजने कोहलीला स्वार्थी म्हटलं होतं. 


विराटची संथ खेळी चर्चेत


हाफीजने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यामध्ये विराट कोहलीने 49 शतकांच्या सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केल्यानंतर विराट स्वार्थी असल्याची टीका केली. भारताने कोलकात्यामधील ईडन गार्डन्सवर झालेला दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना 243 धावांनी जिंकला. विराट कोहलीने परिस्थितीचं भान कायम ठेवत संयमी खेळी केली. विराटने 10 चौकार लगावत 121 बॉलमध्ये नाबाद 101 धावा केल्या. भारताला याच कामगिरीमुळे 326 धावांपर्यंत मजल मारता आली. विराट त्याच्या शतकासाठी एवढा संथ खेळला अशी टीकेची झोड उठली असतानाच विराटची पाठराखण भारताच्या एका माजी क्रिकेटपटूने आणि बॉलिंग कोचने केली आहे. 


होय, आहे विराट स्वार्थी


विराटला स्वार्थी म्हणणाऱ्यांना व्यंकटेश प्रसादने जोरदार उत्तर दिलं आहे. व्यकंटेश प्रसादने विराटवर होणाऱ्या टीकेवर संतापून, "विराट कोहली हा स्वार्थी असल्याचा मजेदार युक्तीवाद ऐकायला मिळाला. विराट हा स्वत:च्या वैयक्तिक विक्रमांसाठी हापहापलेला आहे असंही ऐकलं. होय विराट स्वार्थी आहे. तो इतका स्वार्थी आहे की तो कोट्यवधी लोकांची स्वप्न पूर्ण करतोय. तो इतका स्वार्थी आहे की दरवेळेस तो नवीन विक्रम करतो. तो इतका स्वार्थी आहे की संघ जिंकेल याची तो काळजी घेतो. होय आहे विराट स्वार्थी," अशी पोस्ट आपल्या एक्स म्हणजेच ट्वीटर अकाऊंटवरुन केली आहे.



प्रसादच्या या पोस्टला हजारोंच्या संख्येनं लाईक्स मिळालेत.