World Cup 2023 India Vs New Zealand Semi Final Toss Importance At Wankhede: "शेवटच्या चार ते पाच सामन्यांमधून वानखेडे कसं आहे हे मला समजणार नाही. मात्र मला असं वाटतंय की टॉस फार महत्त्वाचा ठरणार नाही," असं मत भारताचा कर्णधार रोहित शर्माने सामन्याच्या पूर्वसंध्येला मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केलं. भारत आणि न्यूझीलंडदरम्यान आज वानखेडेच्या मैदानावर वर्ल्ड कप 2023 ची पहिली सेमी-फायनल रंगणार आहे. त्यापूर्वी रोहितने केलेलं हे सूचक विधान अनेकांचं लक्ष वेधून घेणारं ठरलं आहे. भारताने 2011 आणि त्यापूर्वी 1983 चा वर्ल्ड कप जिंकला आहे. दुसरीकडे 2 वेळा उपविजेता राहिलाल न्यूझीलंडच्या संघाने 2019 साली भारताला सेमी-फायलनमध्ये स्पर्धेबाहेर फेकलं होतं.


धावांचा पाठलाग करणं अडचणीचं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वानखेडेच्या मैदानावर यंदाच्या वर्ल्ड कपदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या पहिल्याच सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने 399 धावांचा डोंगर अवघ्या 7 विकेट्सच्या मोबदल्यात उभा केला होता. धावांचा पाठलाग करण्यासाठी उत्तम मैदान अशी ओळख असलेल्या या मैदानामध्ये धावांचा पाठलाग करणं संघांना अडचणीचं ठरत आहे. ग्लेन मॅक्सवेलनं केलेल्या दमदार खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानला पराभूत करण्याचा अपवाद वगळता सर्वच संघांना पहिल्यांदा फलंदाजी करुन वर्ल्ड कप 2023 मध्ये या मैदानात विजय मिळाला आहे. साखळीफेरीमधील वानखेडेवरील सरासरी धावसंख्या ही 357 इतकी आहे. दुसरीकडे दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाची सरासरी धावसंख्या 188 वर 9 गडी अशी आहे.


भारताने टॉस जिंकला तर...


वानखेडेवर पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाला पॉवर प्लेमध्ये सरासरी 52 धावांवर 1 विकेट अशी आहे. तर दुसऱ्या डावामध्ये ही सरासरी 42 वर 4 गडी बाद अशी आहे. त्यामुळेच रोहित शर्माने टॉस जिंकला तर तो पहिल्यांदा फलंदाजीचा पर्याय निवडू शकतो. रोहित शर्मा आणि शुभमन गिलच्या आक्रमक फलंदाजीला न्यूझीलंडचे वेगवान गोलंदाज नक्कीच आव्हान देतील. रोहित शर्माने वर्ल्ड कपमध्ये 503 धावा केल्या आहेत. तर शुभमन गिलच्या नावावर 270 धावा आहेत. शुभमन पहिले काही सामने खेळलेला नाही.


टॉस हरल्यास काय?


भारतीय फलंदाजाची मधल्या फळीचा कणा असलेल्या विराट कोहलीने साखळी फेरीतील न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात 95 धावांची खेळी करत पुण्यातील मैदानावर विजय मिळून दिला होता. विराटने 9 सामन्यांमध्ये 594 धावा केल्या आहेत. त्यामुळे भारत टॉस हरल्यास भारताला वेगवान गोलंदाजांच्या कामगिरीवर अवलंबून रहावं लागणार आहे. न्यूझीलंडला कमी धावांवर रोखण्याचं आव्हान भारतीय गोलंदाजांसमोर असेल. शामीने न्यूझीलंडविरुद्धच्या साखळी फेरीतील सामन्यात 5 विकेट्स घेतल्या होत्या. न्यूझीलंडच्या संघाला धर्मशालाच्या मैदानामध्ये 273 धावांवर बाद केलं होतं.