मुंबई : यंदाच्या आयपीएलमध्ये अंपायरने काही निर्णय विवादाचे ठरले. त्यामुळे आयपीएलमध्ये मोठी चर्चा झाली. पुन्हा एकदा अंपायरचा निर्णय वादात सापडला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रिकेटमध्ये मैदानातील अंपायरची भूमिका सर्वात महत्त्वाची असते. सामन्यातील महत्त्वाचे निर्णय अंपायरच्या निर्णयावर घेतले जातात. मात्र सध्याच्या आयपीएलमध्ये सतत खराब अंपायरिंगची उदाहरणं पाहायला मिळत आहेत. 


अंपायरच्या वादग्रस्त निर्णयामुळे क्रिकेट चाहत्यांची निराशा झाली. रविवारी पंजाब विरुद्ध हैदराबाद सामन्यात अंपायरने अतिशय वाईट निर्णय दिला. त्यानंतर आश्चर्याने सर्वजण त्यांच्याकडे पाहातच राहिले.


अंपायरने शाहरुख खानला कॅच आऊट दिलं. पण त्याच्या बॅटला बॉल लागला नव्हता. टी नटराजन बॉलिंग करत होता. तेव्हा बॉल शाहरुख खानच्या हेल्मेटवर लागला. हैदराबादच्या खेळाडूंनी आऊटचं अपील केलं आणि अंपायरनेही आऊट दिलं. 


शाहरुखने रिव्ह्यू घेतला. तेव्हा समजलं की बॉल बॅटला नाही तर हेल्मेटवर लागला आहे. त्याच्या पुढच्या बॉलवर शाहरुखने दमदार सिक्स ठोकला. शाहरुख खानची आक्रमक खेळी वाया गेली. कारण पंजाबला अखेर हैदराबादसमोर पराभवाचा स्वीकार करावा लागला.