मुलाच्या स्वप्नासाठी वडिलांचा मोठा त्याग! कोरोनापासून वाचण्यासाठी सोडलं घर
प्रत्येक मुलाचे आई-वडील आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत मुलासाठी जे जे शक्य होईल ते सर्व करत असतात.
मुंबई: प्रत्येक मुलाचे आई-वडील आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत मुलासाठी जे जे शक्य होईल ते सर्व करत असतात. आपल्या मुलाला कोणतीही अडचण येऊ नये यासाठी कायम झटत असतात. भारतीय क्रिकेट विश्वातील अशाच एका स्टार क्रिकेटरच्या वडिलांनी केलेला त्याग पाहून तुमच्याही पापण्या क्षणभर ओल्या होतील. टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर खेळाडू वॉशिंग्टन सुंदरच्या वडिलांनी मोठा त्याग केला आहे.
देशात कोरोनाच्या लाटेनं भयंकर रुप धारण केलं आहे. अनेकजण आपल्या जवळच्या व्यक्ती गमवत आहे. अशा परिस्थितीत आपल्या मुलाला कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी वॉशिंग्टन सुंदरच्या वडिलांनी चक्क घराचा त्याग केला आहे.
कोरोनाच्या भीतीमुळे ते आपल्या मुलापासून दूर राहात आहेत. टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्यासाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. 18 ते 22 जून दरम्यान सामना होणार आहे. त्याआधी वॉशिंग्टन सुंदरला कोरोना होऊ नये यासाठी त्याचे कुटुंबीय काळजी घेत आहेत.
मनात लग्नाची प्रचंड भीती... पण एका क्षणात या तरुणीला पाहून झाला क्लिनबोल्ड
वॉशिंग्टन सुंदरचे वडील आयकर विभागात काम करतात. त्यामुळे त्यांना आठवड्यातून तीन दिवस तरी ऑफिसमध्ये जाणं भाग असतं. कोरोनामुळे IPL 2021स्थगित झाल्यानंतर वॉशिंग्टन सुंदरचे वडील आपल्या मुलाला कोरोना होऊ नये म्हणून काळजीपोटी घर सोडून दुसऱ्या ठिकाणी राहण्यासाठी गेले.
वॉशिंग्टन सुंदरचे वडील म्हणाले की, 'माझी पत्नी आणि मुलगी त्याच्यासोबत आहे. ते घराबाहेर सतत जात नसल्यानं काळजी करण्याचं कारण नाही. मलाच बाहेर जावं लागत असल्यानं मी घरापासून लांब राहात आहे. इंग्लंड दौऱ्याची संधी वॉशिंग्टनला मिळाली आहे. त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. त्याच्या स्वप्नात कोणताही अडथळा येऊ नये अशी त्यांची अपेक्षा आहे.'
विराट कोहलीची महिला माजी क्रिकेटपटूला मदत, आईच्या उपचारासाठी दिले 6.77 लाख
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी 18 ते 22 जून दरम्यान भारत विरुद्ध न्यूझीलंड अंतिम सामना होणार आहे. त्यानंतर इंग्लंड विरुद्ध टेस्ट सीरिज असणार आहे. वॉशिंग्टन टीम इंडियाकडून खेळणार आहे. त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी वडिलांनी हा मोठा त्याग केला आहे.