मुंबई: भारत विरुद्ध न्यूझीलंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना सुरू आहे. या अंतिम सामन्यात पाचव्या दिवस अखेरपर्यंत टीम इंडियाने एकूण 281 धावा केल्या आहेत. पहिल्या डावात 317 तर दुसऱ्या डावात 64 धावा करून 2 गडी बाद झाले आहेत. तर न्यूझीलंड संघाने पहिल्या डावात 249 धावा केल्या आहेत. किवी संघाची कॉलर ताठ करणारा एक रेकॉर्ड बॉलरनं केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसऱ्या डाव्यात टीम इंडियाला सर्वात मोठा धक्का किवी संघाचा फास्ट बॉलर टिम साउदीनं मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. हा विक्रम करणारा किवीचा दुसरा खेळाडू ठरला आहे. दुसऱ्या ओव्हरमध्ये चौथ्या बॉलवर साउदीने सलामीवीर फलंदाज शुभमन गिलला आऊट करत आपला विक्रम रचला. 


गिलची विकेट घेताच साउदीने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 600 विकेट्स पूर्ण करण्याचा विक्रम केला. कसोटी क्रिकेटमध्ये हा विक्रम करणारा साउदी किवीचा दुसरा खेळाडू ठरला आहे. 



याआधी हा विक्रम माजी दिग्गज स्पिनर डेनियल विटोरी याने केला आहे. त्याच्या नावावर 696 विकेट्स आहेत. तिसऱ्या स्थानावर रिचर्ड हेडली आहे. त्याने आपल्या नावावर 589 विकेट केल्या आहेत. चौथ्या स्थानावर साउदी होता. मात्र या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये त्याने हेडलीला मागे टाकत दुसरं स्थान पटकावलं आहे. 


वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये पहिल्या दिवशी पावसानं धुमाकूळ घातल्यानं खेळ झालाच नाही. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी मिळून टीम इंडियाने 217 धावा केल्या. तिसऱ्या आणि चौथ्या दिवस अखेर न्यूझीलंड संघाने 249 धावा केल्या आहेत. टीम इंडियाने दुसऱ्या डावात 64 धावा केल्या आहेत. आता बाजी कोण मारणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.