Former Cricketer Yograj Singh On Kapil dev : माजी क्रिकेटर युवराज सिंहचे वडील योगराज सिंह त्यांच्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतात. योगराज सिंहने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी सोबतच भारताला पहिला वर्ल्ड कप जिंकवून देणारे माजी क्रिकेटर कपिल देव यांच्यावर सुद्धा निशाणा साधला. योगराज सिंह यांनी कपिल देवबाबत खळबळजनक वक्तव्य केलं. योगराज सिंह हे स्वतः भारताचे माजी क्रिकेटर आहेत, मात्र माजी कर्णधार कपिल देव त्यांच्याशी त्यांचे संबंध फार चांगले नाहीत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कपिल देवबाबत योगराज सिंह म्हणाले की,  "मी जीवनात लोकांना दाखवू इच्छितो की योगराज सिंह कोण आहे.  ज्याला तुम्ही खाली खेचले, आज संपूर्ण जग त्याच्या पायाखाली आहे, त्याला सलाम करते. असे लोक ज्यांनी माझं खूप वाईट केलं त्यापैकी काहींना कॅन्सर आहे, काहींचं घर तुटलं, कोणी मेले, तर काहींच्या घरी मुलगा जन्मला नाही. तुम्ही समजू शकता मी कोणाबद्दल बोलतोय. ज्या माणसाने हे सगळं केलं ते ग्रेटेस्ट कॅप्टन ऑफ ऑल टाइम कपिल देव आहेत. मी त्याला म्हंटल होतं की, तुझे असे हाल करून सोडेन की संपूर्ण जग तुझ्यावर थुंकेल. आज युवराज सिंहकडे 13 ट्रॉफी आहेत तर कपिल देवकडे फक्त एक वर्ल्ड कप आहे". 


हेही वाचा : आज पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताचे 3 मेडल्स पक्के, कसं आहे 2 सप्टेंबरच संपूर्ण शेड्युल?


धोनीबाबत सुद्धा योगराज सिंहने केलं असं वक्तव्य : 


योगराज सिंह यांनी कपिल देव बाबत बोलल्यावर माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीवरही निशाणा साधला. ते म्हणाले. "मी महेंद्रसिंग धोनीला कधीही माफ करणार नाही. त्याने आधी त्याचा चेहरा आरशात पहावा. तो नक्कीच चांगला क्रिकेटर आहे, पण त्याने माझ्या मुलाविरुद्ध जे काही केलं, ते आता समोर येत आहे. त्यामुळे मी त्याला आयुष्यात कधीही माफ करणार नाही. मी आयुष्यात दोन गोष्टी कधीच केल्या नाहीत. पहिलं म्हणजे माझ्यासोबत चुकीचं करणाऱ्या लोकांना मी कधीच माफीनामा देत नाही अन् दुसरं म्हणजे मी त्यांना कधीच मिठी मारणार नाही, मग ते माझ्या कुटूंबातील असो वा माझी मुलं, असं योगराज सिंग यांनी म्हटलं आहे. 


योगराज सिंहने पुढे म्हंटले की, "महेंद्रसिंग धोनीने माझ्या मुलाचं आयुष्य खराब केलं. तो अजून 4 ते 5 वर्ष अजूनही खेळू शकला असता. युवराजसारखे खेळाडू माझ्यासारख्या अनेकांनी जन्माला घातले पाहिजे. तुम्हाला आठवत असेल तर गौतम गंभीर आणि विरेंद्र सेहवाग देखील म्हटले होते की, युवराज सारखा प्लेयर पुन्हा होऊ शकत नाही. त्यामुळे कॅन्सर असताना देखील देशासाठी वर्ल्ड कप खेळल्याबद्दल भारताला त्याला भारतरत्न द्यावा, अशी मागणी योगराज सिंग यांनी केली आहे".