आज पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताचे 3 मेडल्स पक्के, कसं आहे 2 सप्टेंबरच संपूर्ण शेड्युल?

चौथ्या दिवसाअंती भारताच्या खात्यात 7 पदकांचा समावेश झाला आहे. आता 2 सप्टेंबर रोजी सोमवारी भारताच्या खात्यात आणखीन 3 पदकांचा समावेश होणार हे निश्चित आहे.

पुजा पवार | Updated: Sep 2, 2024, 12:29 PM IST
आज पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताचे 3 मेडल्स पक्के, कसं आहे 2 सप्टेंबरच संपूर्ण शेड्युल?  title=
(Photo Credit : Social Media)

Paralympic 2024 : ऑलिम्पिकनंतर आता पॅरिसमध्ये पॅरालिम्पिक 2024 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. भारताने या स्पर्धेत एकूण 84 खेळाडूंचा चमू पाठवला असून चौथ्या दिवसाअंती भारताच्या खात्यात 7 पदकांचा समावेश झाला आहे. यात एक सुवर्ण, 2 रौप्य तर 4 कांस्य पदकांचा समावेश आहे. 2 सप्टेंबर रोजी सोमवारी भारताच्या खात्यात आणखीन 3 पदकांचा समावेश होणार हे निश्चित आहे. हे मेडल्स बॅडमिंटन स्पर्धेत सुहास लालिनाकेरे यथिराज, थुलसीमाथी मुरुगेसन आणि नितेश कुमार यांच्याकडून येतील. ही तिन्ही खेळाडू पॅरा बॅडमिंटनमध्ये गोल्ड मेडलचा सामना खेळणार आहेत. नितेश कुमार याचा सामना संध्याकाळी 3, थुलसीमाथी मुरुगेसनचा सामना रात्री 8 तर सुहास एलवाई याचा सामना रात्री 9: 40 रोजी होणार आहे. 

दुसरीकडे पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडू शिवराजन सोलाईमलाई, निथ्या सुमति सिवान, मनीषा रामदास आणि सुकांत कदम हे ब्रॉन्झ मेडलचे सामने खेळताना दिसून येतील. या खेळाडूंकडून भारताला कांस्य पदकाची अपेक्षा असेल. यंदाच्या पॅरालिम्पिक स्पर्धेत नेमबाजीत भारताला सर्वाधिक मेडल्स मिळाले आहेत.  

 

2 सप्टेंबर रोजी पॅरालिम्पिक 2024 मध्ये भारताचे संपूर्ण शेड्युल : 

 

नेमबाजी : 

निहाल सिंह आणि आमिर अहमद (मिक्स्ड 25 मीटर पिस्टल SH1 क्वालिफिकेशन प्रिसिजन) दुपारी 12:30 वाजता 

निहाल सिंह आणि अमीर अहमद भट (मिक्स्ड 25 मीटर पिस्टल SH1 क्वालिफिकेशन रॅपिड) संध्याकाळी 4:30 वाजता 

निहाल सिंह आणि अमीर अहमद भट (मिक्स्ड 25 मीटर पिस्टल SH1 फायनलमध्ये (जर क्वालिफाय झाले तर) रात्री 8:15 वाजता 

 

एथलेटिक्स

 

योगेश कथुनिया (मेंस डिस्कस थ्रो – F56 फायनल) दुपारी 1:35 वाजता 

कंचन लखानी (महिला डिस्कस थ्रो – F53 फायनल) रात्री 10:34 वाजता 

दीप्ति जीवनजी (महिला 400 मीटर – टी20 राउंड 1 – हीट 1) रात्री 11:50 वाजता 

 
 

बॅडमिंटन : 

शिवराजन सोलाईमलाई आणि निथ्या सुमति सिवान (मिक्स्ड डबल्स SH6 कांस्य पदक सामना) दुपारी 1:40 वाजता

नितेश कुमार (मेंस सिंगल SL3 गोल्ड मेडल सामना) संध्याकाळी 3:30 वाजता 

थुलसीमाथी मुरुगेसन (महिला सिंगल एसयू5 स्वर्ण पदक सामना) रात्री 8 वाजता 

मनीषा रामदास (महिला सिंगल एसयू5 कांस्य पदक सामना) रात्री 8 वाजता 

सुहास लालिनाकेरे यथिराज विरुद्ध लुकास मजूर (फ्रांस) - (पुरुष सिंगल एसएल4 स्वर्ण पदक सामना) रात्री 9:40 वाजता 

सुकांत कदम विरुद्ध फ्रेडी सेतियावान (इंडोनेशिया) - (पुरुष सिंगल एसएल4 कांस्य पदक सामना - F64 फाइनल)  रात्री 9:40 वाजता 

निथ्या श्री सुमति सिवान विरुद्ध रीना मार्लिना (इंडोनेशिया) - (महिला सिंगल SH6 कांस्य पदक सामना) रात्री 11:50 वाजता 

 

तीरंदाजी: 

राकेश कुमार आणि शीतल देवी (मिश्रित टीम कंपाउंड ओपन क्वाटर फायनल) रात्री 8:40 वाजता 

 

भारताकडून यंदा पॅरालिम्पिकमध्ये 84 खेळाडूंचा सहभाग : 

पॅरिस पॅरालिम्पिक 2024 साठी भारताने यंदा 84 खेळाडूंचा समूह पाठवला आहे. हे खेळाडू विविध 12 स्पर्धांमध्ये भाग घेणार असून यात 52 पुरुष तर 32 महिला खेळाडूंचा समावेश आहे. पॅरिस पॅरालिम्पिक 2024 स्पर्धेची सांगता 9  सप्टेंबरला होईल. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x