नवी दिल्ली : बराच काळ टीमपासून बाहेर असलेल्या ऑल राऊंडर क्रिकेटर युवराज सिंगच्या निवृत्तीच्या चर्चा जोर धरू लागल्या. पण युवराजने आपल्या रिटायरमेंट प्लानविषयी सांगितलयं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोनाको मध्ये आयोजित १८ व्या लॉरिअस वर्ल्ड स्पोर्ट्स अॅवॉर्ड दरम्यान युवराजने सर्वांशी संवाद साधला. 


महत्वाची टूर्नामेंट 


मला आयपीएलमध्ये चांगल प्रदर्शन करायचयं. माझ्यासाठी ही खूप महत्त्वाची टूर्नामेंट आहे. याआधी २०१९ पर्यंत माझ्या खेळण्याची दिशा ठरलेली आहे. मला २०१९ पर्यंत खेळायचे आहे. त्यानंतर मी पुढचा निर्णय घेईन. 


ही खंत कायम राहील 


 २०१९ पर्यंत खेळल्यानंतर तो निवृत्तीवर विचार करणार आहे. २०११ च्या विश्वचषकामध्ये युवराज भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला होता.


त्यानंतर कॅन्सरशी लढून तो पुन्हा मैदानात उतरला. मी टेस्ट क्रिकेटमध्ये स्थान पक्क करू शकलो नाही याबद्दल नेहमी खंत राहील असेल युवराज म्हणतो.  


'तेव्हा मला कॅन्सर झाला'


 करियरच्या सहा-सात वर्षे मला जास्त संधी मिळाली नाही. त्यावेळी टेस्टमध्ये माझ्यापेक्षा खूप चांगले खेळाडू होते. जेव्हा संधी मिळाली तेव्हा मला कॅन्सर झाला.


याचीच खंत नेहमी राहील पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात', या शब्दात त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या.