मुंबई : रिलायन्स JIO तुमच्यासाठी नोकरीची संधी उपलब्ध करुन दिलेय. त्यामुळे पात्र उमेदवार नोकरीसाठी अर्ज करु शकता. तब्बल ८० हजार पदांसाठी ही बंपर नोकर भरती असणार आहे. जिओने आपले सोशल मीडिया विस्तार वाढविण्यावर भर देणार आहे. यासाठी ही बंपर भरती असणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रणाणात नोकरीची संधी उपलब्ध होत आहे. त्यामुळे तुम्हीही अर्ज करा आणि नोकरीची संधी मिळवा.


आर्थिक वर्ष २०१८-२०१९ मध्ये भरती


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंटरनेट डेटामध्ये धमाका करणारी कंपनी रिलायन्स जिओने आता नोकरी शोधणाऱ्यांसाठी ही गुडन्यूज दिलेय. रिलयान्स जिओ कंपनी आर्थिक वर्ष २०१८-२०१९ मध्ये ८० हजार जणांची भरती करणार आहे. रिलायन्स जिओचे मुख्य मानव संसाधन अधिकारी संजय जोग यांनी एका कार्यक्रमात याबाबत माहिती दिलेय. जिओ यावर्षी ७५ हजार ते ८० हजार नव्या नोकऱ्या उपलब्ध करेल असे त्यांनी सूचीत केलेय. आधीपासूनच कंपनीत १.५७ लाख लोक नोकरी करीत आहेत. त्यात आणखी भर पडेल.


रिलायन्स जिओने ६ हजारांपेक्षा जास्त महाविद्यालयांसोबत भागीदारी केली आहे. त्यामुळे येथून बाहेर पडणाऱ्यांनाही नोकरीची संधी उपलब्ध होवू शकते. दरम्यान, अद्याप या भरतीला सुरूवात झालेली नाही , त्यामुळे भरतीसाठी अर्ज कसा करायचा याची नेमकी माहिती देण्यात आलेली नाही. 


कसा करायचा अर्ज ?


भरतीची सुरुवात झाल्यानंतर रिलायन्स जिओच्या अधिकृत संकेतस्थळ www.jio.com वर गेल्यानंतर careers या पर्यायावर क्लिक करावे लागेल. संकेतस्थळावर खालच्या बाजूला हा पर्याय आहे. त्याठिकाणी नोकरीबाबत सर्व माहिती उपलब्ध असण्याची शक्यता आहे.