Electricity Bill and Portable Solar Generator : कडक ऊन्हामुळे तापमानाचा पारा चांगला वाढला आहे. गर्मीने तुम्ही हैराण आहात. मात्र, वीज बिलाच्या भितीपोटी तुम्ही एसी किंवा कुलर घ्यायचा विचार करत नसाल तर तो विचार आता बदला. कारण घरात असे एक उपकरण बसवले तर वीज बिल येणार नाही एसी आणि कुलर ( AC- Cooler) इकदम फ्रीमध्ये चालेल. तुम्हाला तुमच्या घराचे वीज बिल कमी करायचे आहे आणि तुमची घरातील उपकरणे सौरऊर्जेद्वारे चालवायची असतील तर तुम्हाला लाखो रुपये खर्च करण्याची गरज नाही. फक्त काही हजार रुपये खर्च करुन तुम्ही घरात सोलर पॅनल बसवू शकता आणि सौरऊर्जेचा लाभ उठवू शकता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सौरऊर्जेचा वापर व्हावा यासाठी सरकार प्रोत्साहन देत आहे. सोलर पॅनलपासून वीज बनवण्याचे काम खूप महाग आणि जिकिरीचे आहे, परंतु आता जर तुम्हाला तुमच्या घराचे वीज बिल कमी करायचे असेल आणि तुमची गृहोपयोगी सौरऊर्जेद्वारे चालवायची असेल तर तुम्हाला आता लाखो रुपये खर्च करावे लागणार नाहीत. फक्त काही हजार रुपये खर्च करुन ते सहज करु शकता.


कमी खर्चात बसवा पोर्टेबल सोलर जनरेटर 


वीज बिल कमी येण्यासाठी तुम्ही घरात  पोर्टेबल सोलर जनरेटर बसवू शकता. याचे नाव आहे SR Portables Solar Generator. हे सौर ऊर्जा जनरेटर तुम्हाला तुमच्या घरातील सर्व उपकरणांसाठी वीज पुरवठा प्रदान करण्यास सक्षम आहे. तुम्हाला तुमचा पंखा, टीव्ही, संगणक किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे चालवायची असतील, तर या सौरऊर्जा जनरेटरचा वापर केल्याने तुम्हाला या सर्व गोष्टी चालवण्यास मदत होईल. त्याचा आकार खूपच लहान आहे ज्यामुळे ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज घेऊन जाऊ शकता.


या पोर्टेबल सोलर जनरेटरचा उपयोग चांगला होतो. पॉवर बॅकअप देण्यास हा पोर्टेबल सोलर जनरेटर अधिक सक्षम आहे. तुमच्या इलेक्ट्रिक ग्रिडमधून विद्युत पुरवठा थांबला तरीही, तुम्ही हे सौर ऊर्जा जनरेटर वापरुन विजेची उपकरणे चालवणे सुरु ठेवू शकता. यामुळे तुम्हाला तुमच्या दैनंदिन कामात कोणत्याही अडथळा येणार नाही आणि तुम्ही टेन्शन फ्री राहू शकता.


पोर्टेबल सोलर जनरेटर किती वीज जनरेट करतो?


एसआर पोर्टेबल्स सोलर जनरेटरचा वापर वीज पुरवठा करण्यासाठी सहज करता येतो, हा 130 वॅट क्षमतेचा पोर्टेबल सोलर जनरेटर आहे. शिवाय, यात 2 एसी कनेक्टर पोर्ट आहेत जे 100 वॅट्सचे एसी आउटपुट प्रदान करतात. या सौर जनरेटरसह, तुम्हाला एक Li-Ion बॅटरी पॅक मिळेल जो तुम्हाला जास्त काळ विद्युत पुरवठा करतो. याव्यतिरिक्त, हे एक शक्तिशाली एलईडी प्रकाश देखील देतो. ज्यामुळे ते कॅम्पिंग ट्रिपमध्ये किंवा आपल्या घरातील गरजांसाठी उपयुक्त ठरते. या सौर जनरेटरची किंमत 17,999 रुपये आहे जी त्याच्या वापरावर अवलंबून असू शकते.