अनुष्काच्या हातातील फोन पाहून चाहते थक्क! यापूर्वी भारतात कधीच दिसला नाही असा फोन
Anushka Sharma Pregnant: सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये अनुष्का शर्मा कारच्या फ्रण्ट सीटवर बसल्याचं दिसून येत आहे.
Anushka Sharma Pregnant: भारताचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली आणि त्याची अभिनेत्री पत्नी अनुष्का शर्मा पुन्हा चर्चेत आहेत. हे दोघेही दुसऱ्यांदा आई-बाबा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या वर्ल्डकप स्पर्धा खेळवली जात असून अचानक विराट कोहली संघाची साथ सोडून अनुष्काला भेटण्यासाठी मुंबईत आला. हे दोघेही एका डॉक्टरच्या क्लिनिकबाहेर प्रसारमाध्यमांच्या कॅमेरात कैद झाले. मात्र या फोटोंबरोबरच अनुष्काच्या व्हायरल झालेल्या काही फोटोंमध्ये तिच्या हाती असलेल्या फोनने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
तो व्हिडीओ चर्चेत
विरल भयानीने पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमध्ये अभिनेत्री अनुष्का शर्मा मुद्दाम तिच्या हातातील फोन दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. हा एक फोल्डेबल फोन असून तो उघडतानाही अनुष्काला थोडे कष्ट घ्यावे लागत असल्याचं दिसत आहे. आधी तुम्ही हा व्हिडीओ पाहा मग आपण हा फोन कोणता आहे हे जाणून घेऊयात...
कोणता आहे हा फोन?
आता या वरच्या व्हिडीओत दिसणारा फोन हा अद्याप भारतात लॉन्चही झालेला नाही. अनुष्काच्या हातात दिसणारा हा फोन वनप्लस कंपनीचा आहे. भारतात पहिल्यांदाच वनप्लसचा फोल्डेबल फोन दिसून आला आहे. मागील अनेक दिवसांपासून या फोनची भारतामधील टेक जगतामध्ये चर्चा आहे. एका वृत्तानुसार 19 ऑक्टोबर रोजी हा फोन लॉन्च केला जाणार आहे. या फोनसंदर्भातील काही डिटेल्सही समोर आले आहेत. या फोनचा लूक कसा असेल यासंदर्भातील काही बातम्या समोर आल्या होत्या. मात्र आता अनुष्काच्या हातात थेट हा फोनच दिसून आल्याने टेक जगतामधील चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
फोनचे फिचर्स काय?
प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी अनुष्का कारमध्ये बसलेली असताना तिचे फोटो काढत होते तेव्हा ती वनप्लसचा हाच फोन हातात घेऊन बसली होती. या फोनच्या मागील बाजूस एक गोलाकार आकाराचा कॅमेरा कटआऊट दिसत आहे. वनप्लस ओपन नावाने ओळखल्या जाणाऱ्या या वनप्लसच्या फोल्डेबल फोनच्या लीक झालेल्या रेंडरप्रमाणेच हा गोलाकार आकार वाटत आहे. वनप्लसनेही लवकरच फोल्डेबल फोन बाजारात लॉन्च करणार असल्याचं म्हटलं आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 एसओसी, 16 जीबी रॅम, 256 जीबी स्टोरेज दिली जाईल असं सांगितलं जात आहे. फोनमध्ये ड्युएल डिस्प्ले असेल असं सांगितलं जात आहे. या फोनचा डिस्प्ले 7.8 इंचांच असू शकतो. बाहेरील डिस्प्ले 6.3 इंचाचा असण्याची शक्यता आहे.
कॅमेरा सेटअप कसा?
वनप्लसच्या या फोल्डेबल फोनमध्ये ट्रिपल रेअर कॅमेरा कॉन्फिगरेशन असू शकतं. यात ऑप्टिकल इमेज स्टेबिलायझेशन (ओआयएस) असलेला 50 मेगापिक्सल सेन्सर, एक अल्ट्रा-वाइड लेन्स असलेला 48 मेगापिक्सल सेन्सर आणि एक 32 मेगापिक्सल सेन्सरचा समावेश असू शकतो. फोनच्या पुढील भागी सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ड्युएल 32 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा सेन्सर देण्यात येऊ शकतो.
किंमत किती?
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील जाणकार असलेल्या योगेश ब्रारच्या हवाल्याने अॅण्ड्रॉइड अथोरिटीने दिलेल्या वृत्तानुसार 1.2 लाख रुपयांहून कमी असेल असा अंदाज व्यक्त केला आहे.