बंद होणारा हा स्मार्टफोन, तुमचा तर नाही ना?
तुम्ही जर ऍप्पलचा स्मार्टफोन खरेदी करत असाल तर, तुमच्यासाठी काहीशी दु:खदायक बातमी आहे. आयफोन एक्स हे मॉडेल यंदा (२०१८) बंद होण्याची शक्यता आहे. हा आमचा नव्हे तर, एका एजन्सीचा दावा आहे.
नवी दिल्ली: तुम्ही जर ऍप्पलचा स्मार्टफोन खरेदी करत असाल तर, तुमच्यासाठी काहीशी दु:खदायक बातमी आहे. आयफोन एक्स हे मॉडेल यंदा (२०१८) बंद होण्याची शक्यता आहे. हा आमचा नव्हे तर, एका एजन्सीचा दावा आहे.
फोनची विक्री अत्यंत मर्यादित राहिली
ऍप्पलने गेल्यावर्षीच अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त आपला नवा कोरा हॅंडसेट आयफोन एक्स लॉन्च केला होता. ऍप्पलचा हा स्मार्टफोन बेस्ट-सेलिंग आयफोन्सपैकी एक होता. पण, तोह तितका लोकप्रिय ठरू शकला नाही. कारण, ऍप्पलने या फोनचे उत्पादन अत्यंत मर्यादीत स्वरूपात केले होते. त्यामुळे मार्केटमध्ये हा फोन हव्या त्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकला नाही. त्यातच उत्पादस होत असलेल्या उशीर झाल्याने सुरूवातीपासूनच या फोनची विक्री अत्यंत मर्यादित राहिली. त्यामुळे शक्यता वर्तविण्यात येत आहे की, २०१८मध्ये पहिल्याच तिमाहीत या स्मार्टफोनची केवळ १८ मिलियन यूनिट्सच विकली जातील.
सर्वात महत्त्वाचे कारण
KGI सेक्युरिटीचे विश्लेशक Ming-Chi Kuoने दिलेल्या माहितीनुसार, आयफोन एक्सने ऍप्पलची पुरती निराशा केली. कारण, आयफोन एक्सकडून ज्या प्रमाणात हवे होते त्या प्रमाणात यश मिळाले नाही. या फोनची विक्री कंपनीने अंदाज केला होता त्या प्रमाणात मुळीच झाली नाही. दरम्यान, आयफोन एक्सची विक्री घटन्यामागे चीन असल्याचेही सांगितले जात आहे. चीनच्या युजर्सना आयफोन एक्सचा डिस्प्ले अत्यंत छोटा वाटला.
आयफोनच्या सीरीज १० च्या तुलनेत सीरीज ६ आणि ७ प्रभावी
आयफोन एक्समध्ये ५.८ इंचाची स्क्रिन आहे. मात्र, त्याचा प्रत्यक्षात वापरात येणारा एरिया प्रत्यक्षात ५.५इंचापेक्षाही कमी आहे. याउलट जुन्या आयफोनमध्ये हा एरिया अधिक होता. यूजर्सना आयफोनच्या सीरीज १० च्या तुलनेत सीरीज ६ आणि ७ अधिक आवडली. ऍप्पलला या मॉडेलकढून चांगला प्रतिसाद मिळाला
कधी बंद होणार आयफोन एक्स?
प्राप्त माहितीनुसार, आयफोन एक्स कधी बंद होणार याबाबत कोणतिही अधिकृत माहिती नाही. कंपनीनेही तशी घोषणा केली नाही. पण, यंदा हा स्मार्टफोन नक्की बंद होणार अशी चर्चा आहे.