History Of Lamborghini: ‘लेम्बोर्गिनी’ हे नाव ऐकताच आपल्या समोर चित्र उभं राहातं ते स्टायलिश स्पोर्ट्स कार (Sports Car). Lamborghini ही देशातील सर्वात प्रसिद्ध कार कंपन्यांपैकी एक असून ही कार तिच्या वेगासाठी ओळखली जाते. पण आज या कारचं जसं रुप आहे तसं आधी नव्हतं. या कारच्या जन्माची कहाणी खूपच रंजक आणि प्रेरणादायी आहे. शेतकऱ्याच्या मुलाच्या मेहनतीचं आणि जिद्दीचं हे फळ आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लेम्बोर्गिनीची स्थापना फारुशियो लेम्बोर्गिनी ( Ferruccio Lamborghini) यांनी 1963 मध्ये इटलीच्या (Italy) सेंट अगाता बोलोनीज मध्ये केली. फारुशियो यांना वेगवान गाड्या खरेदी करण्याचा छंद होता. त्या काळात लक्झरी (Luxury) आणि महागड्या गाड्या ठेवण्यासाठी फारुशियो इटलीत प्रसिद्ध होते. पण लेम्बोर्गिनी कारची निर्मिती हा त्यांचा शौक नव्हता. तर एका व्यक्तीकडून झालेल्या अपमानाचा बदला घेण्याचा उद्देश होता.


कार नाही... ट्रॅक्टर बनवत होती कंपनी
आज जी कंपनी लेम्बोर्गिनीसाठी ओळखली जाते. ती कंपनी सुरुवातीच्या काळात शेतात चालणाऱ्या ट्रॅक्टरसाठी ओळखली जात होती. 1945 साली दुसरं महायुद्ध संपल्यानंतर इटली अनेक मित्र देशांनी आपली सैनिकी वाहनं आणि उपकरणं तिथेच सोडून दिली. फारुशियो लेम्बोर्गिनी हे शेतकऱ्याचे पूत्र होते, पण ते नेहमीच मशीन दुरुस्तीत रमलेले असायचे. दुसऱ्या महायुद्धात (Second Wordl War) फारुशियो लेम्बोर्गिनी यांनी मॅकेनिक म्हणून अनेक लढाऊ विमानं आणि लष्करी वाहनांची दुरुस्ती केली होती.


युद्ध संपल्यानंतर फारुशियो यांनी बेकार झालेल्या वाहनांच्या इंजीन आणि इतर पार्ट्सपासून शेतीचा ट्रॅक्टर बनवण्याचा व्यवसाय सुरु केला. उत्तम तंत्रज्ञान आणि मजबूत इंजीनमुळे अल्पावधीत त्यांच्या ट्रॅक्टरला मागणी वाढू लागली. आपल्या शेतातल्या छोट्याशा जागेत सुरु केलेल्या व्यवसाय मोठ्या प्लान्टमध्ये बदलला होता. मागणी पुर्ण करण्यासाठी त्यांना काही माणसं भरती करावी लागली. बघता बघता फारुशियो यांच्या नावावर एक मोठी कंपनी उभी राहिली होती. 


अपमानाचा बदला घेतला
फारुशियो लेम्बोर्गिनी यांना स्पोर्ट्स कारचा छंद होता. त्या काळात त्यांच्याकडे एक जग्वार, एक मासेराती, एक टॉप-एंड मर्सिडीज आणि दोन फेरारी कार होत्या. पण फेरारी कारच्या क्लचचा त्यांना अनेकवेळा त्रास झाला. त्यासाठी त्यांना अनेकवेळा फेरीराच्या सर्व्हिसिंग फॅक्टरीत जावं लागत होतं. पण यानंतही क्लचची समस्या कायम होती. त्यानंतर त्यांनी आपल्या ट्रॅक्टर मॅकेनिकांकडून त्याची तपासणी केली. फेरारीत ट्रॅक्टरचा क्लच वापरला जात होता आणि जो कारसाठी योग्य नव्हता असं मॅकेनिकांच्या निदर्शनास आलं. त्यांनी ही गोष्ट फारुशियो यांच्या कानावर घातली. फेरारी क्लच (Cluch) रिपेअर करण्यासाी 1000 लीअर आकार होते. पण फारुशियो यांच्या मॅकेनिकांनी हा क्लचची केवळ 10 लीअरमध्ये दुरुस्ती केली.


त्यामुळे फारुशियो यांनी थेट फेरारीच्या मालकांची भेट घेण्याचं ठरवल आणि ते त्यांच्या भेटीला पोहोचले. फारुशियो यांनी फेरारीच्या क्लचमध्ये समस्या असल्याचं फेरारीरीचे मालक एंजो फेरारी यांना सांगितलं. फारुशियो यांचं बोलणं ऐकून एंजो संतापले आणि त्यांच्या अंगावर धावून गेले. समस्या कारममध्ये नाही तर ड्रायव्हरमध्ये आहे. ट्रॅक्टर बनवण्याला कारमधलं काय कळणार असं एंजो यांनी फेरोशिया यांना ऐकवलं. 


एंजो फेरारी यांनी केलेला अपमान फेरोशिया यांच्या मनाला टोचला. या अपमानाचा बदला घेण्याचं त्यांनी ठरवलं. त्यांनी स्वत:चा एक कारखाना उघडला आणि त्यात फेरारीच्या काही इंजिनिअर्सना दगडा पगार देत कामावर ठेवलं. या इंजिनिअर्सने 240 किमी प्रति तास धावणाऱ्या एका कारचा अविष्कार केला. या कारला फेरोशिया यांनी Lamborghini 350 GT असं नाव दिलं. लेम्बोर्गिनीचा लोगो म्हणून त्यांनी रुषभ राशीचा म्हणजे बैलाची निवड केली. त्याला रेसिंग बुल असंही म्हटलं जातं. लेम्बोर्गिनी बाजारात आली त्याच्या आकर्षक लूक आणि वेगामुळे अल्पावधीतच प्रसिद्ध झाली. आज लेम्बोर्गिनी सर्वात महाग कार आणि स्टेट्स म्हणून ओळखली जाते.