QR Code Scam : भाजी घेणं असो, नाहीतर दूधाची पिशवी, पेट्रोल पंप असो, नाहीतर शॉपिंग मॉल्स. हल्ली ऑनलाईन पेमेंट (Online Payment) करणं अगदी सोप्पं झालं. मोबाईलमधून QR कोड स्कॅन करा आणि अवघ्या काही सेकंदात पेमेंट डन. विशेषतः नोटबंदीनंतर (Demonetisation) ऑनलाईन पेमेंटचं प्रमाण झपाट्यानं वाढलंय. पण QR कोडची ही सुविधा ग्राहकांसाठी उपयोगी असली तरी तिचे साईड इफेक्टही (Side Effect) ग्राहकांना भोगायला लागतायत. कारण QR कोड फ्रॉडचं (Fraud) म्हणजे फसवणुकीचं पेव फुटल्यानं ग्राहकांना लाखो करोडो रुपयांना चुना लावला जातोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कसा होतो QR कोड फ्रॉड?


तुम्ही जेव्हा कॉन्टॅक्टलेस QR कोड पेमेंट करता, तेव्हा पैसे संबंधितांच्या बँक अकाऊंटमध्ये ट्रान्सफर होतात. याचाच फायदा घोटाळेबाज घेतात. हे लोक QR कोड बदलून टाकतात. त्यामुळे पेमेंट घोटाळेबाजांच्या खात्यात जमा होतं. त्यामुळं कोणत्याही दुकानात QR कोड पेमेंट करताना दुकानदाराचं वेरिफाईड नाव जरूर विचारा. एखादा QR कोड स्कॅन करताना अनोळखी वेबसाईट ओपन होत असेल तर सावध व्हा
कोणतंही पेमेंट रिसीव्ह करताना UPI पीन क्रमांकाची गरज नसते. त्यामुळं पेमेंट करण्याच्या नावाखाली कुणी QR कोड स्कॅन करायला सांगून UPI पीन मागत असेल तर ते ट्रान्झॅक्शन मुळीच करू नका.


नजर हटी, दुर्घटना घटी असा बोर्ड आपण रस्त्यावर नेहमी वाचतो QR कोड पेमेंट करतानाही नेमकं असंच घडू शकतं. तुमची एक चूक आणि तुमचं बँक खातं रिकामं होऊ शकतं.


'क्यूआर कोड' म्हणजे ‘क्वीक रिस्पॉन्स’ कोड. हा कोड 'स्कॅन' करून खरेदी करण्याचा पर्याय सध्या मोठ्या प्रमाणावर वापरला जात आहे. मोठमोठ्या दुकानांपासून अगदी किरकोळ विक्रेत्यांकडे सुद्धा क्यूआर कोड स्कॅन करुन पैसे भरण्याचा पर्याय उपलब्ध आहे. क्यूआर कोडवरुन बील चुकतं करताना ग्राहकाला लाभार्थी किंवा लाभार्थीच्या खात्याचा तपशील जाणून घेण्याची आवश्यकता नसते. शिवाय व्यवहाराचा बंदोबस्त देखील जलद होतो. क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर, ग्राहक रक्कम प्रविष्ट करतो आणि पासवर्ड प्रविष्ट करून पेमेंट प्रमाणित करतो आणि रक्कम लाभार्थीच्या खात्यात अगदी सहज हस्तांतरित केली जाते.