Jioला टक्कर देण्यासाठी BSNLचा नवा धमाका, ग्राहकांना मिळणार हा फायदा
रिलायन्स जिओने आपली सेवा लॉन्च करताच सर्वच टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले. त्यानंतर इतर कंपन्यांनीही ग्राहकांना आपल्याकडे आकर्षीत करण्यासाठी स्वस्त आणि नवे प्लान्स लॉन्च करण्यास सुरुवात केली आहे.
नवी दिल्ली : रिलायन्स जिओने आपली सेवा लॉन्च करताच सर्वच टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले. त्यानंतर इतर कंपन्यांनीही ग्राहकांना आपल्याकडे आकर्षीत करण्यासाठी स्वस्त आणि नवे प्लान्स लॉन्च करण्यास सुरुवात केली आहे.
काही दिवसांपूर्वी एअरटेलने आपल्या सध्याच्या ३४९ आणि ५४९ रुपयांच्या प्लान्समध्ये बदल करत डेटा लिमिट वाढवला होता. त्यानंतर रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर देत ४ प्लान्सच्या दरात कपात केली.
रिलायन्स जिओने हॅप्पी न्यू ईयर प्लान अंतर्गत १जीबी इंटरनेट डेटा प्रतिदिन वापर करणाऱ्या सर्व युजर्ससाठी दोन ऑफर्स आणल्या आहेत. नव्या ऑफरनुसार, जिओ आपल्या १जीबी डेटा प्रतिदिन प्लानची किंमत ६० रुपयांनी कमी केली होती.
रिचार्ज पॅकची वैधता वाढवली
बीएसएनएलने आपल्या ग्राहकांना नव्या वर्षांचं गिफ्ट देत अनलिमिटेड कॉल आणि डेटा असलेल्या प्रीपेड रिचार्ज पॅकची वैधता वाढवली. यामध्ये बीएसएनएलच्या १८६ रुपयांचा प्लान, १८७ रुपयांचा प्लान, ३४९ रुपये, ४२९ रुपये, ४८५ रुपये आणि ६६६ रुपयांच्या प्लानचा समावेश आहे.
या बदलांसोबतच बीएसएनएलकडून आपल्या ग्राहकांसाठी अधिकाधिक १२९ दिवसांची वैधता असलेल्या पॅकची ऑफर सादर केली आहे. या प्लानमध्ये अनलिमिटेड वॉईस कॉल, एसएमएस आणि १.५ जीबीपर्यंत डेटाची सुविधा मिळणार आहे.
जिओकडून मिळत आहे टक्कर
असं मानलं जात आहे की, जिओला टक्कर देण्यासाठी बीएसएनएलने हा निर्णय घेतला आहे. कारण, BSNLने स्वस्त आणि मस्त प्लान्स सादर करुन इतर टेलिकॉम कंपन्यांना चांगलाच दणका दिला आहे.
BSNLने आपले प्लान्स केले अपग्रेड
बीएसएनएलकडून अपग्रेड करण्यात आलेल्या प्लान्सचा विचार केला तर त्यामध्ये १८६ रुपयांत २८ दिवस, ३४९ रुपयांत ५४ दिवस आणि ४२९ रुपयांच्या प्लानमध्ये ८१ दिवसांसाठी १जीबी डेटा दररोज मिळणार आहे. तर, ४८५ रुपयांच्या प्लानमध्ये ९० दिवसांपर्यंत आणि ६६६ रुपयांच्या प्लानमध्ये १२९ दिवसांपर्यंत दररोज १.५ जीबी डेटा मिळणार आहे. यासोबतच बीएसएनएलच्या नव्या पॅकमध्ये अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी-रोमिंग कॉल (मुंबई आणि दिल्ली वगळता) सोबतच १०० एसएमएस दररोज मिळणार आहेत.