MG Electric Car: एमजी मोटार इंडिया नव्या वर्षाच्या सुरुवातील आपलं चौथं मॉडेल लाँच करणार आहे. टू सीट लेआउट असलेली कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक कार बाजारात आणणार आहे. एमजी सिटी इव्हीचा (MG City EV) टाटा टियागो इव्ही (Tata Tiago EV) या 5 सीटर गाडीशी स्पर्धा असेल.  टाटा टियागो इव्ही सध्या देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे. एमजी सिटी इव्ही सर्वसामन्यांच्या खिशाला परवडणारी असेल. हे मॉडेल जून 2023 पर्यंत लॉन्च होण्याची शक्यता आहे. राजीव चाबा (अध्यक्ष आणि एमडी, एमजी मोटर इंडिया) यांनी सांगितलं की, 'कंपनी आपल्या ग्राहकांना कंटेंपरेरी तंत्रज्ञानासह उत्तम वॅल्यू ऑफर करण्यात विश्वास ठेवते.'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चाबा पुढे म्हणाले की, आगामी कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक कारमध्ये पहिल्या टप्प्यात 60 टक्के लोकलाइज्ड कंपोनेंट्स सतील. आयातीवरील अवलंबित्व कमी होईल आणि त्याची किंमत आटोक्यात राहील. त्याचबरोबर स्थानिकरित्या असेंबल केलेला बॅटरी पॅक मिळेल. रिपोर्टनुसार, ब्रिटीश ऑटोमेकर बॅटरी पॅक टाटा ऑटोकॉम्पकडून मिळवेल. MG ची ही मिनी इलेक्ट्रिक कार फक्त 2.9 मीटर लांब असू शकते. हे विशेषत: गजबजलेल्या शहरी भागांसाठी तयार केले जाईल. 


या गाडीमध्ये मोठी टचस्क्रीन, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, वायरलेस कनेक्टिव्हिटी यासह अनेक उत्कृष्ट फीचर्स दिले जाऊ शकतात. कॉम्पॅक्ट EV ला अँगुलर फ्रंट बंपर आणि स्क्वेरिश हेडलॅम्प्ससह बॉक्सी स्टॅन्स मिळेल. यामध्ये स्लिम फॉग लॅम्प, क्रोम स्ट्रिप्सद्वारे जोडलेला फुल-वाइड लाइट बार आणि एमजी लोगोसह चार्जिंग पोर्ट डोअर मिळेल.


क्या बात है! स्पोर्टी लूक आणि प्रीमियम फीचर्ससह Yamaha Scooter तयार, पाहा Photo


यात 12-इंच स्टील रिम्स, नंबर प्लेट हाऊसिंगवर हॉरिजॉन्टल लाइट बार, कर्व्ड विंडस्क्रीन आणि लहान टेललॅम्प मिळतील. त्याचा व्हीलबेस 2010mm असू शकतो. त्याच्या पॉवरट्रेन सेटअपबद्दल बोलायचं तर,  20kWh - 25kWh क्षमतेचा बॅटरी पॅक मिळू शकतो. हा बॅटरी पॅक 150 किमीची रेंज देण्यास सक्षम आहे.