मुंबई : 2 मिनिटात काय होतं असं म्हणत असताना मॅगी आली, आणि म्हणाली फक्त 2 मिनिटात मॅगी बनते. पण मॅगीलाही लाजवणारं काम तुम्ही करु शकतात. कारण मॅगीला आता स्पर्धा आहे चपातीची. चपाती बनवण्याचा कंटाळा आला होता, म्हणून मॅगीने भाव खाल्ला होता, पण आता मॅगीलाही लाज वाटेल असं काम प्रेशर कुकरने करुन दाखवलं आहे. लॉकडाऊनमध्ये कुणाची नोकरी जाईल आणि कुणाला कामाचा बोनस मिळेल हे सांगता येत नाही. (cook 3 roti in 2 minitues in pressure cooker) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसंच काहीसं झालंय कुकरने तव्याची नोकरी घालवली आहे, आणि बोनस प्रेशर कुकरने पटकावला आहे. कारण चपाती लाटून सरळ प्रेशर कुकरमध्ये टाकली की 2 मिनिटात 3 चपात्या टम्म फुगून येतात. त्या देखील एकमेकांना न चिटकता. 



हे व्हीडिओत दिसतंय, आता या चपात्या कशा बनवतात त्या तुम्ही खालील व्हीडिओत पाहा. चपात्या करताना नीट हाताळा, ही तुमचीच जबाबदारी असेल. कारण चपाती करण्याचा शॉटकट तुम्ही शिकताय.


पण खरोखर हे मॉडल यशस्वी असेल तर असंच म्हणावं लागेल. लॉकडाऊनमध्ये तव्याची नोकरी गेली आणि कुकरला मिळाला बोनस, मलाच चांगली चपाती येते म्हणणाऱ्या बायकोने गमावला स्वाभिमान...तर तुम्हीच पाहा हे मॅगीला लाजवणारं काम...2 मिनिटात झटपट 3 चपात्या...


संबंधित बातम्या : 


Microsoft Windows 11चा नवा लूक, हे आहेत टॉप फीचर्स


Reliance AGM 2021: Googleसोबत Jioने केलं टायअप, भारतातील सर्वात स्वस्त 4G फोन, लवकरच लाँच