मुंबई : गॅजेट आणि वेगवान कारच्या दुनियेत डुकाटी (Ducati)  हे नाव काही नवं नाही. सध्या हीच कंपनी आपल्या ब्रँडचा अधिकाधिक विस्तार करण्यासाठी Pro-I Evo नावाच्या नव्या स्कूटरच्या माध्यमातून सर्वांपर्यंत आली आहे. या स्कूटरनं सध्या अनेकांच्या नजरा वळवल्या आहेत. 280Wh च्या बॅटरीच्या माध्यमातून ही स्कूटर 350W इतका मोटर देते. या ई स्कूटरचं डिझाईन पाहिल्यास हँडलबारवर असणारा लोगो वगळता  Xiaomi M365 इलेक्ट्रिक स्कूटरची आठवण होत आहे. (ducati presents Most affordable electric 2 wheeler scooter costs only approx 40000 rupees)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डुकाटीची ही स्कूटर फोल्डेबल असून ती एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यास आणि कपाटामध्येही ठेवण्यास अगदी सोपी आहे. या स्कूटरचं वजन 12 किलो असून, प्रतीतास 25 किमी इतक्या टॉप स्पीजपर्यंत ती परफॉर्म करते. जवळपास 100 किलोंचा भार उचलण्याची क्षमता या स्कूटरमध्ये आहे. यामध्ये क्रूज कंट्रोलसोबतच इको, डी आणि एस असे तीन रायडिंग मोड देण्यात आले आहेत.


स्कूटरचे दमदार फिचर्स 


- ही स्कूटर इको मोडमध्ये 6 किमी प्रतीतास, डी मोडमध्ये 20 किमी प्रतीतास आणि एस मोडमध्ये 25 किमी प्रतीतास इतक्या वेगानं धावते.


- या स्कूटरमध्ये प्रो-आय ईवो मध्ये स्प्लॅश गार्डसोबत 8.5 इंचांचा स्प्लॅश गार्ड देण्यात आला आहे. ज्यामध्ये ड्युअल ब्रेक फ्रंट, रिअर डिस्क ब्रेक, साईड इंडिकेटर लाईट देण्यात आल्या आहेत.


- कलर एलईडी स्क्रीन आणि एलईडी लाईट्ससोबत या स्कूटरमध्ये एक इंन्स्ट्रुमेंट पॅनलही देण्यात आलं आहे. रात्रीच्या वेशी विजिबलिटी अर्थात दृश्यमानता कमी झाल्याच याचा अधिकच्या सुरक्षेसाठी फायदा होतो.


- डुकाटी प्रो आय ईवो इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 500 डॉलर म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये पाहिल्यास 36 हजारांपर्यंत पोहोचत आहे.


संबंधित बातम्या : 


या 5 इलेक्ट्रिक स्कूटरच्या किमतीत मोठी घट, थेट 18,000 रुपयांची सूट


Hyundai ची सर्वात मोठी SUV Alcazar आज होणार लाँच; जाणून घ्या फिचर्स