Elon Musk Twitter Deal : जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीतील एक नाव म्हणून एलॉन मस्कचे नाव चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच एलॉन ट्विटरही विकत घेत असल्याच्या अनेक चर्चा रंगल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चर्चांना उधाण आलेले असतानाच एकाएकी हे डील रद्द झाल्याची माहिती आली. आता एलॉनवर ही वेळ का आली? हाच प्रश्न विचारला जात असताना त्याने याबाबत स्पष्टीकरणही दिले. एलॉनने नवीन ट्विट करत डील रद्द करण्याची माहिती दिली आहे.


एलॉनने डीलबाबत ट्विटद्वारे दिलेले स्पष्टीकरण -


'जोपर्यंत ट्विटर कंपनी 5 टक्क्यांपेक्षा कमी फेक यूजर्स असल्याचा पुरावा देत नाही तोपर्यंत हा व्यवहार होणार नाही', या एका ओळीत त्याने बऱ्याच गोष्टी स्पष्ट केल्या.  त्याचबरोबर एलॉनने सांगितले की, ट्विटरवर आतापर्यंत 20 टक्के किंवा त्याहून अधिक फेक यूजर्स किंवा स्पॅम अकाऊंट आहेत. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, फक्त 5 टक्के फेक यूजर्स असल्याचा आहे. मात्र कंपनीचा हा दावा चुकीचा असल्याचे समोर आले आहे. ट्विटरचा सीईओ पराग अग्रवाल यांनी सार्वजनिकरित्या ही माहिती स्वीकारण्यास नकार देत असल्याचे एलॉन मस्कने सांगितले.



5 टक्क्यांहून अधिक फेक अकाऊंट्स -


ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांनी सोमवारी एक ट्विट करत म्हटलं, 'गेल्या तीन महिन्यांपासून ट्विटरवरील फेक अकाऊंट्सची संख्या 5 टक्क्यांहून कमी आहे. मात्र एलॉनने स्पॅम अकाऊंची पूर्णपणे माहिती देण्यास सांगितले.'


अग्रवाल यांची ही भूमिका पाहता, त्यांचे उत्तर आता एलॉनला पटते का आणि पटल्यास एलॉन हा व्यवहार पुढे नेतो का यावरच संपूर्ण जगाची नजर लागली आहे.