सॅन फ्रान्सिस्को - फेसबुकने 'स्नुझ' हा नवा ऑप्शन त्यांच्या ग्राहकांसाठी खुला केला आहे.  या पर्यायामुळे सुमारे दोन बिलियम ग्राहकांना नको असलेल्या पेज, मित्रांकडील नोटिफिकेशन्स बंद करता येणार आहेत. 


फीचर 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'स्नुझ' या ऑप्शनमुळे 30 दिवसांसाठी तुम्ही नको असलेली नोटिफिकेशन दूर ठेवू शकणार आहात. यामुळे एखाद्या मित्राला अनफॉलो न करता तुम्ही 30 दिवसांसाठी त्यांना दूर ठेवू शकता.  


कुठे असाणार हे फीचर ? 


पोस्टच्या उजव्या बाजूला ड्रॉप डाऊन ऑप्शनमध्ये 'स्नूझ' हा पर्याय असेल.यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही त्या व्यक्ती, पेज, ग्रुप  यांच्या मेसेजपासून सुटका मिळवू शकता. म्हणजेच ते मेसेज किंवा पोसट तुमच्या फीडवर दिसणार नाहीत. 



अनावश्यक बडबड कमी होणार 


अनेकदा विनाकारण चॅट करणार्‍या व्यक्तीपासून लपण्यासाठी तुम्हांला त्याला ब्लॉक करावं लागत असे किंवा चॅट विंडो बंद ठेवावी लागत असे. मात्र आता तसे करायची गरज नाही. 


फेसबुकचे प्रयत्न 


फेसबुकने यापूर्वीदेखील अनफॉलो, हाईड, सी फर्स्ट, रिपोर्ट असे ऑप्शन दिले होते. मात्र आता 'स्नुझ' ऑप्शनमुळे नवा पर्याय खुला झाला आहे.