मुंबई : फ्लिपकार्ट (Flipkart) या ऑनलाईन साईटवर सध्या रियलमी डेज सुरु आहे. हा सेल येत्या 24 नोव्हेंबर पर्यंत सुरु असणार आहे. या सेलमध्ये अनेक वस्तुवर बंपर डिस्काऊंट देण्यात येतोय.आता रियलमी स्मार्टफोनवर (Realme Smartphone) बंपर सुट मिळतोय. 21 हजार रूपये किमतीचा हा स्मार्टफोन फक्त 999 रूपयात मिळत आहे. त्यामुळे या स्मार्टफोनवर नेमकी काय ऑफर देण्यात येत आहे, हे जाणून घेऊयात. 


हे ही वाचा : फक्त 999 रूपयात मिळतोय Smart TV, जाणून घ्या ऑफर


ऑफर काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 फ्लिपकार्ट रियलमी डे (Realme day Sale) सेलमध्ये Realme 9 या स्मार्टफोनी किंमत खुपच कमी करण्यात आली आहे. Realme 9 ची लॉन्चिंग किंमत 20 हजार 999 रुपये आहे. परंतु सेल दरम्यान ती 16 हजार 999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. म्हणजेच फोनवर 4 हजार रुपयांची सूट दिली जात आहे. फोनवर एक्सचेंज ऑफर (Exchange Offer) देखील मिळत आहे, ज्यामुळे फोनची किंमत खूपच कमी होईल.


एक्सचेंज ऑफर 


Realme 9 वर 16 हजार रुपयांची एक्सचेंज ऑफर (Exchange Offer) आहे. तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज केल्यास तुम्हाला इतकी सूट मिळू शकते. पण 16,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर तेव्हाच मिळेल जेव्हा फोन चांगल्या स्थितीत असेल आणि मॉडेल नवीनतम असेल. तुम्ही फुल एक्सचेंज ऑफर मिळवण्यात यशस्वी ठरल्यास फोनची किंमत 999 रुपये असेल.


बँक ऑफर 


जर तुम्हाला जुना स्मार्टफोन एक्सचेंज करायचा नसेल तर बँक ऑफर (Bank Offer) देखील आहे. तुम्ही Flipkart Axis Bank क्रेडिट कार्ड वापरल्यास, तुम्हाला रु.850 चा कॅशबॅक मिळेल. या प्रकरणात, फोनची किंमत 16,149 रुपये असेल.


दरम्यान या रियलमी सेलमध्ये (Realme day Sale) असे बंपर डिस्काऊंट मिळतायत. त्यामुळे फोन घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी ही खुप चांगली ऑफर आहे.