मुंबई : फोर्ड इंडियानं गुरुवारी त्यांची नवी SUV इकोस्पोर्टचं नवं व्हेरियंट लॉन्च केलं आहे. कंपनीनं या गाडीची दिल्ली एक्स शोरूमची किंमत ७,३१,२०० रुपये एवढी ठेवली आहे. फोर्ड इंडियानं इकोस्पोर्टला पुन्हा डिझाईन केलं आहे. कंपनीनं नव्या इकोस्पोर्टच्या बाहेरच्या लूकबरोबरच इंटिरियरही बदललेलं आहे. याचबरोबर गाडीमध्ये नवं इंजिनही लावण्यात आलं आहे. गाडीमध्ये लावण्यात आलेलं हे नवं इंजिन आधीपेक्षा जास्त शक्तीशाली आणि किफायती आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इकोस्पोर्टमध्ये तीन सिलेंडर असणारं १.५ लीटरचं टीआय-व्हीसीटी पेट्रोल इंजिन आहे. फोर्डची इकोस्पोर्ट पेट्रोल १७ किलोमिटर प्रती लिटरचं ऍव्हरेज देणार असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. तर डिझेल २३ किलोमिटर प्रतीलिटरचं ऍव्हरेज देईल.



फोर्ड इकोस्पोर्टमध्ये ६ एअरबॅग आणि अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिमची सुविधा  देण्यात आली आहे. कंपनीने गाडीच्या १२३ यूनिटची अ‍ॅडव्हांस बुकिंग सुरू केली होती. काही तासांमध्येच सर्वच गाड्या बुक झाल्या होत्या. अमेझॉनवर ५ नोव्हेंबरला फक्त २४ तासांसाठीच ही ऑफर उपलब्ध होती. मध्यरात्री सुरु झालेल्या या ऑफरमध्ये सकाळी १० वाजेपर्यंतच १२३ जणांनी गाडी बूक केली होती. अमेझॉनवर फक्त १० हजार रुपये भरून ही गाडी बुक करता येत होती.