नवी दिल्ली : व्हॉट्सअॅप आणि स्नॅपचॅट वापरणं हे सर्वसामान्यांच्या दैनंदिन आयुष्यातील एक भाग ठरत आहे. आपल्यापैकी अनेकांचा दिवस व्हॉट्सअॅप मेसेजपासून सुरु होतो तर व्हॉट्सअॅप मेसेजवरच संपतो. मात्र, हेच व्हॉट्सअॅप आणि स्नॅपचॅट वापरण्यावर एका कंपनीने बंदी घातली आहे. पाहूयात काय आहे संपूर्ण प्रकार...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर्मनीतील एका कंपनीने आपल्या ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांना व्हॉट्सअॅप आणि स्नॅपचॅट वापरण्यावर बंदी घातली आहे. कंपनीने हा निर्णय अशा कर्मचाऱ्यांसाठी घेतला आहे जे कार्यालयात फोनवर व्हॉट्सअॅप किंवा स्नॅपचॅटचा वापर करतात. 


कंपनीचा डेटा लीक होऊ नये याची खबरदारी म्हणून व्हॉट्सअॅप आणि स्नॅपचॅटवर बंदी घातली आहे. व्हॉट्सअॅपच्या डेटा लीक प्रकरणानंतर जगभरात डेटा संदर्भात चिंता व्यक्त करण्यात येत आहे.


आपल्या कर्मचाऱ्यांच्या फोनवर लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप आणि स्नॅपचॅट बॅन करण्याचा निर्णय जर्मनीतील कार पार्ट्स बनवणारी कंपनी कॉन्टीनेन्टलने घेतला आहे. 


कंपनीने घेतलेल्या या निर्णयाचा फटका ३६ हजार कर्मचाऱ्यांना बसणार आहे. या निर्णयामुळे हे कर्मचारी कार्यालयात व्हॉट्सअॅप आणि स्नॅपचॅट वापरु शकणार नाहीयेत. कार पार्ट्स बनवणाऱ्या कंपनीचे जगभरात २४०००० स्टाफ आहे.