गुगलची डोअर बेल देणार घरी आलेल्या पाहुण्यांची माहिती
गेटवर उभ्या असलेल्या व्यक्तिशी कॅमेराद्वारे संवादही साधता येणार आहे.
मुंबई : गुगलवर आपल्या जगभरातील सर्व माहिती एका क्लिकवर मिळते. पण तुमच्या घरी कोण आलंय याची माहिती हवी असेल तर ? काळजी करु नका. गुगलमुळे आता हेदेखील शक्य होत आहे. गुगलच्या नव्या तंत्रज्ञानानुसार घरा बाहेर असलेल्या पाहुण्यांची घरातून चेहरा ओळख होणार आहे. गुगलने 'नेस्ट हॅल्लो' नावाची डोअर बेल आणली आहे. याच्या फेशिअल रिकग्निशन टेक्नोलॉजीमुळे दरवाज्यावर उभ्या व्यक्तिचा व्हिडिओ रेकॉर्ड होऊ शकतो. 'द गर्जियन' ने दिलेल्या वृत्तानुसार ही डोअरबेल वायफायवर चालणाऱ्या या स्मार्ट डोअरबेलमध्ये एक वाईड अॅंगल कॅमेरा असेल. हा कॅमेरा हाय डेफिनेशन व्हिडिओदेखील रेकॉर्ड करु शकेल. गेटवर उभ्या असलेल्या व्यक्तिशी कॅमेराद्वारे संवादही साधता येणार आहे. या नाईट व्हिजन मोडमध्येही काम करु शकणार आहे. एवढंच नव्हे, तर घराच्या आता गुगल असिस्टेंट स्पीकरदेखील असणार आहे. त्यामुळे डोअरबेलद्वारे बाहेर आलेल्या पाहुण्यांची सूचना मिळू शकणार आहे.
स्मार्टफोनवर माहिती
'डेलीमेल'ने दिलेल्या वृत्तानुसार तुम्ही घरी नसतानाही घराबाहेर आलेल्या पाहुण्यांची माहिती ही डोअरबेल देणार आहे. डोअर बेल घरात असलेल्या व्यक्तीला ऐकू येईलच त्यासोबत घरातील मालकाच्या स्मार्टफोनवरही याची माहिती मिळणार आहे.अॅण्ड्रॉईड आणि अॅप्पलच्या फोनवर ही सुविधा असणार आहे. तुम्हाला हवं असल्यास यामध्ये तुम्ही बायडिफॉल्ट मेसेजही सेव्ह करुन ठेवू शकता. त्यामुळे गरज पडल्यास डोअर बेल घरी आलेल्या पाहुण्यांना स्वत:हून उत्तर देऊ शकेल. ब्रिटनमध्ये याची किंमत २२९ पाऊंड आहे. भारतात ही डोअरबेल कधी लॉंच होईल याबद्दल कंपनीतर्फे अद्याप अधिकृत माहिती देण्यात आली नाही.