E-SIM Card: QR कोड स्कॅन करा आणि एका मिनिटांत पैसे दुसऱ्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर होतात. अशाच प्रकार आता तुमचे सिमदेखील एका मोबाइलमधून दुसऱ्या मोबाइलमध्ये ट्रान्सफर होईल. ई सिम दुसर्या मोबाईलमध्ये ट्रान्सफर करण्यासाठी गुगलने खास सुविधा आणली आहे. ई-सिम ट्रान्सफर करण्यासाठी आधी कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये जावे लागत होते. मात्र, गुगलने हे काम आता अधिक सोप्पे केले आहे. गुगल अँड्रोइड युजर्ससाठी एक नवीन सिस्टम तयार करत आहेत. ही सिस्टम UPIप्रमाणे काम करणार आहे. यात ई-सिम QRकोडच्या मदतीने एका स्मार्टफोनमधून दुसऱ्या मोबाइलमध्ये ट्रान्सफर केले जाणार आहेत. 


ई-सिमचा वाढता वापरा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयफोनमध्ये ई-सिम सपोर्ट देण्यात आलं आहे. त्याचबरोबर काही अँड्रोइड स्मार्टफोनमध्येही ई-सिमचा ऑप्शन देण्यात आला आहे. ई-सिमहा सिमकार्डच्या तुलनेने जास्त सुरक्षित पर्याय आहे. यामुळं फ्रॉड होण्याच्या शक्यता कमी होतात. मात्र, ई-सिमच्या ईकोसिस्टममध्ये अनेक प्रकारच्या गुंतागुती आहेत. त्या गुगल दूर करण्याच्या प्रयत्नात आहे. गुगलकडून QR कोडच्या मदतीने ई-सिम एका मोबाईलमधून दुसऱ्या मोबाईलमध्ये ट्रान्सफर करण्याची सिस्टमवर काम करत आहे. जर या प्रयत्नाला यश आले तर येत्या काही दिवसांत सिमकार्डचा वापर झपाट्याने कमी होणार आहे. 


ई -सिम ट्रान्सफर फिचर कधी लाँच होणार 


ई-सिमची नवीन सिस्टम कधी लाँच होणार याबाबत अद्याप तारिख जाहीर झाली नाहीये. सध्या गुगलकडून कोणतीही डेडलाइन देण्यात आली नाहीये. 


युजर्सचे काम होणार सोप्पे


QRकोड स्कॅन करुन ई-सिम ट्रान्सफर करण्याची सिस्टम तयार झाल्यानंतर युजर्सचे काम अधिक सोप्पे होणार आहे. त्याचबरोबर सिमची सुरक्षिततादेखील मिळणार आहे. जेणेकरुन सायबर क्राइम व फ्रॉडच्या प्रकरणात घट होणार आहे. 


दरम्यान, आयओएस युजर्सना ऑनलाइन ई-सिम ट्रान्सफर करण्याची सुविधा देण्यात आली आहे. मात्र, याची प्रक्रिया खूप मोठी आणि किचकट आहे. तसंच, सगळ्याच टेलिकॉम कंपन्यांकडून ई-सिम ट्रान्सफरचा ऑप्शन देण्यात येत नाही. 


ई-सिमकार्ड म्हणजे काय?


ई-सिम कार्ड हे एक डिजिटल सिम कार्ड आहे. जे फोनमध्ये सिम कार्डप्रमाणे वापरले जाते. याला व्हर्च्युअल सिम कार्ड असेही म्हणतात. भारतात ई-सिम कार्ड अद्याप सामान्यपणे उपलब्ध नाहीत. मात्र लवकरच ई-सिमकार्डची सेवा भारतातही उपलब्ध होऊ शकते. याशिवाय अमेरिका, कॅनडा, युरोपियन युनियन, जपान, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया आदी देशांमध्ये ई-सिमकार्डचा वापर केला जात आहे.