नवी दिल्ली : गूगलकडून तयार करण्यात आलेले अॅन्ड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम जगभरात सर्वाधिक वापरले जाते. जर तुमच्याकडेही अॅन्ड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम आहे तर ही बातमी नक्की वाचा. अॅन्ड्रॉइडचे इतक्या मोठ्या संख्येत वापरकर्ते असूनही हा प्लॅटफॉर्म पूर्णपणे सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीही गूगलने आपल्या प्ले स्टोअरमधून व्हायरस पसरवणारे 22 अॅप हटवले होते. पुन्हा एकदा शेकडो मोबाईल अॅपमध्ये मालवेयर आणि अॅडवेयर असल्याचे सिक्योरिटी रिसर्रर्सकडून सांगण्यात आले. या अॅप्सना 15 कोटींहून अधिक वापरकर्त्यांनी गूगल प्ले स्टोअरमधून डाऊनलोड केले असल्याचे सिक्योरिटी फर्म पॉइंट चेककडून सांगण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मालवेयर डब्ड सिमबॅडने (Dubbed SimBad) अॅड सर्व्हिसिंग प्लॅटफॉर्मच्या फॉर्मेटमध्ये 200 हून अधिक अॅपवर परिणाम झाला आहे. गूगल स्कॅनिंगच्या सिस्टमला मागे टाकून त्यावर मालवेयर परिणाम करू शकतो. हे मालवेयर एकदा फोनमध्ये इन्स्टॉल झाल्यानंतर फोनच्या बॅकग्राउंडमध्ये चालू राहू शकते. गूगल प्ले स्टोअरमधून 200 गेम हटवण्यात आले आहेत. 


सिक्योरिटी रिसर्चने परिणाम होणाऱ्या अॅपची लिस्ट गूगलला दिली. त्यानंतर गूगलने या सर्व अॅप्सना प्ले स्टोअरवरून काढून टाकले आहे. गूगलकडून या अॅप्सना प्ले स्टोअरवरून काढून टाकल्यानंतरही वापरकर्त्यांच्या फोनमध्ये अॅप अजूनही चालू असल्याचे समोर आले आहे. सर्वाधिक डाऊनलोड होणाऱ्या गेम्सना जवळपास 55 लाख वापरकर्त्यांनी डाऊनलोड केले आहे. स्नो हेवी एक्सावेटर सिम्युलेटर, होवरबोर्ड रेसिंग आणि रियल ट्रॅक्टर फार्मिंग सिम्युलेटर अशा अॅपचा यात समावेश आहे.