नवी दिल्ली : सरासरी प्रत्येकी तीन भारतीयांपैकी (Indian) एक भारतीय दररोज एका तासापेक्षा जास्त ऑनलाईन व्हिडिओ (Online Video) पाहतो, अशी माहिती गुगलच्या (Google) एका रिपोर्टमधून समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुगलच्या रिपोर्टनुसार, ऑनलाईन व्हिडिओ पाहताना सर्वाधिक हिंदी भाषेतील व्हिडिओ पाहिले जातात. 54 टक्क्यांसह हिंदी भाषा ऑनलाईन व्हिडिओसाठी सर्वात वरच्या स्थानावर आहे. त्यानंतर इंग्रजी भाषेतील व्हिडिओ 16 टक्के लोकांकडून पाहिले जातात. तेलुगु 7 टक्के, कन्नड 6 टक्के, तमिळ 5 टक्के तर बांग्ला भाषेतील ऑनलाईन व्हिडिओ 3 टक्के भारतीयांकडून पाहिले जातात.


रिपोर्टनुसार, यावर्षी भारतातील विविध प्रदेश, लोकसंख्या आणि सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीचे ऑनलाईन व्हिडिओ पाहणाऱ्यांची संख्या वाढून 50 कोटी होण्याचा अंदाज आहे. गुगलने रिपोर्टद्वारे सांगितलं की, भारतात ऑनलाईन व्हिडिओ पाहणारे सुमारे 37 टक्के लोक ग्रामीण भागातील आहेत.


'एक गोली, एक दुश्मन'; पाहा भारतीय लष्कराचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ


दिवसाला 100 फ्री SMS पाठवण्याची मर्यादा संपुष्ठात; TRAIचा मोठा निर्णय


गुगलचा हा, 'अंडरस्टँडिंग इंडियाज ऑनलाईन व्हिडिओ व्ह्यूअर' रिपोर्ट 6500 हून अधिक लोकांमधील सर्वेक्षणावर आधारित आहे. त्यापैकी जवळपास 73 टक्के लोक 15 ते 34 वयोगटातील होते.


रिपोर्टनुसार असं आढळलं की, ऑनलाइन व्हिडिओ पाहण्याचा दररोजचा सरासरी वेळ 67 मिनिटं असतो. त्याशिवाय, नवीन इंटरनेट वापरकर्तेही दररोज सरासरी 56 मिनिटं ऑनलाईन व्हिडिओ पाहत आहेत, असं रिपोर्टमधून सांगण्यात आलं आहे. 


जगभरातील Appsला 'आरोग्य सेतु'ची टक्कर