Google Search May Land You in Jail: गूगलचा वापर आज खूप सामान्य झाला आहे. Googleला 'गूगल बाबा' असेही गंमतीने म्हटले जाते. आपल्या सर्वांना माहित आहे की तुम्ही गूगलवर कोणत्याही प्रश्नाचे उत्तर शोधले की लगेच उत्तर मिळते. पण तुम्हाला माहित आहे का की, काही प्रश्नांची उत्तरे शोधणे धोकादायक ठरु शकते. नसेल तर आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टींची माहिती देत ​​आहोत ज्या तुम्ही चुकून सर्च केल्यास तुम्हाला तुरुंगवासही होऊ शकतो.


चाइल्ड पोर्नोग्राफी:


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर तुम्ही गूगलवर चाइल्ड पोर्नोग्राफीशी संबंधित काहीही शोधले तर तुम्ही तुरुंगात जाऊ शकता. तुम्हाला मोठा दंडही भरावा लागू शकतो. हा एक अतिशय संवेदनशील विषय आहे आणि तो शोधणे तुमच्यासाठी धोकादायक ठरु शकते.


फिल्म पायरसी:


आता आपल्या सर्वांना फिल्म पायरसीबद्दल माहिती आहे. भारतात यावर बंदी आहे. यानंतरही बरेच लोक त्याबद्दल शोध घेतात किंवा हे काम करतात. गूगल तुम्हाला चित्रपटाचे पायरेटिंग करताना किंवा त्याच्याशी संबंधित कोणताही शोध करताना आढळल्यास, तुम्हाला मोठा दंड आकारला जाईल. तसेच तुम्हाला लॉक-अप मध्ये जावे लागेल.


बॉम्ब बनवण्याची प्रक्रिया:


जर तुम्ही चुकून किंवा विनोदाने बॉम्ब बनवण्याची प्रक्रिया गूगलवर सर्च केली तर ते नियमांचे उल्लंघन मानले जाते. असे केल्यास तुरुंगात टाकले जाईल. यासोबतच तुमच्यावरही योग्य ती कारवाई केली जाईल. आम्ही तुम्हाला सांगतो की, तुम्ही गूगलवर अशी एखादी गोष्ट सर्च करताच, तुमचा आयपी अॅड्रेस थेट सुरक्षा यंत्रणांपर्यंत पोहोचेल. यानंतर सुरक्षा एजन्सी तुमच्यावर कारवाई करु शकतात. त्यामुळे सावधान राहा.