व्हॉट्सऍपवर चुकूनही करु नका `हे` काम, सरकार आणतंय नवी सिस्टिम
व्हॉट्सऍपवर अफवा पसरविणारा तात्काळ पकडला जाईल
मुंबई : देशातील बहुतेक मोबाइल फोनवर व्हॉट्सऍपचा (Whatsapp) वापर होतोय. आपले मेसेज इंक्रिप्टेड असल्याचा दावा भलेही व्हॉट्सएपने केलाय. तरीही प्रायव्हसी पॉलिसीबाबत व्हॉट्सऍपवर बरेच युजर्स (Whatsapp Users) नाराज आहेत. दरम्यान, केंद्र सरकार यासंदर्भात नवीन कायदा आणणार आहे. हा नियम एकदा समजून घ्या अन्यथा तुमच्या समोरच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
देशात अफवा आणि खोटा प्रसार रोखण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. यासाठी असा आराखडा तयार केलाय. ज्यामुळे व्हॉट्सऍपवर अफवा पसरविणारा तात्काळ पकडला जाईल. टेक साइट telecomtalk ने यासंदर्भात माहिती दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने व्हॉट्सऍपला Alpha-Numeric Hash Assigning System लागू करण्यास सांगितले आहे. या प्रणालीच्या अंमलबजावणीनंतर अफवा पसरविणा लोकांची तातडीने ओळख पटेल.
Alpha-Numeric Hash Assigning System लागू झाल्यानंतर प्रत्येक मेसेजसह एक संख्या तयार होईल. या प्रणालीद्वारे, मेसेज पाठविणाऱ्याचा शोध घेतला जाऊ शकतो.
व्हॉट्सऍपमध्ये सध्या एंड-टू-एंड एनक्रिप्शन तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. ज्यामुळे केवळ प्रेषक आणि प्राप्तकर्ता संदेश पाहू शकतो. सरकारचे म्हणणे आहे की नवीन प्रणाली लागू केल्याने प्रायव्हसी सिस्टमचे उल्लंघन होणार नाही.
व्हॉट्सऍपला केंद्र सरकारचा हा नवीन प्रस्ताव मान्य करायचा नाहीय. कंपनीचे म्हणणे आहे की, यामुळे अॅपच्या प्रायव्हसी धोरणाचे उल्लंघन होते. भारत सरकार या नव्या प्रस्तावाला देशातील कायदा आणि सुव्यवस्थेशी जोडण्याचा विचार करीत आहे.