Haier अप्लायन्सने आपलं नवं प्रोडक्ट भारतात लाँच केलं आहे. Haier Kinouchi Dark Edition AC भारतात लाँच झाला आहे. या एसीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानासह स्टायलिश डिझाईनचं कॉम्बिनेशन मिळतं असं कंपनीने सांगितलं आहे. विशेष म्हणजे या एसीच्या कंप्रेसरवर ब्रँड लाईफटाइम वॉरंटी देत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा एअर कंडिशन 1.6 टन आणि 1 टन क्षमतेत उपलब्ध आहे. कंपनीचा दावा आहे की, Haier Kinouchi Dark Edition AC 20 पट वेगाने कुलिंग करु शकतं. तसंच 60 डिग्री सेल्सिअस तापमानातही प्रभावीपणे कुलिंग देतं. 


Haier AC मध्ये खास काय?


या एसीमध्ये सेल्फ क्वीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलं आहे. जे तुम्हाला 99.9 टक्के पर्यंत निर्जंतुकीकरण करून स्वच्छ हवा पुरवते. हे 15 मिनिटांत हवा स्वच्छ करू शकते. यात संपूर्ण डीसी इन्व्हर्टर तंत्रज्ञानाचं फिचरही देण्यात आलं आहे. दमदार परफॉर्मन्ससाठी यामध्ये ड्युएल डीसी कंप्रेसर दिला आहे. 


यूजर्स कूलिंग कॅपिसिटीला इंटेलिजेंस कन्वर्टिबल फिचरच्या मदतीने नियंत्रित केलं जाऊ शकतं. या AC मध्ये चांगली कार्यक्षमता आणि वीज वाचवण्यासाठी Intelli Pro सेंसर वापरण्यात आलं आहे. टर्बो मोडमुळे युजर्सना फास्ट कूलिंग मिळेल. हे 20 मीटरपर्यंतच्या एअर फ्लोसह येतं. 


कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, एसीमध्ये स्पेशल कोटिंगचा वापर करण्यात आला आहे. ज्यामुळे कंपोनेंट्स जास्त काळ प्रभावीपणे काम करु शकतात. स्टेबल ऑपरेशनसाठी एसीमध्ये Hyper PCB चा वापर करण्यात आला आहे. 


किंमत किती?


Haier Kinouchi Dark Edition ला कंपनीने 46,990 रुपयांमध्ये लाँच केलं आहे. हा एसी भारताच्या प्रमुख रिटेल स्टोअर्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. लाँच ऑफरमध्ये कंपनी या एसीवर 5 वर्षांची सर्वसमावेशक वॉरंटी देत आहे. ज्याची किंमत 15,990 रुपये आहे. यामध्ये एसीवर 10 टक्के कॅशबॅक ऑफर मिळेल. कंपनी मोफत इन्स्टॉलेशन आणि लाईफटाइम कंप्रेसर वॉरंटी देत आहे.