Hero Electric Scooter: तुम्ही जर इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. याचं कारण म्हणजे हिरो मोटोकॉर्पने त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या किंमतीत मोठी कपात केली आहे. हिरो मोटोकॉर्पने गतवर्षी Vida ब्रँडच्या अंतर्गत दोन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केल्या होत्या. ज्यावेळी कंपनीने Vida V1 Plus आणि V10 Pro ला बाजारात लॉन्च केलं होतं तेव्हा त्यांची किंमत अनुक्रमे 1 लाख 45 हजार आणि 1 लाख 59 हजार ठरवण्यात आली होती. पण आता मात्र कंपनीने दोन्ही स्कूटरच्या किंमतीत मोठी कपात केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंपनीने Vida V1 Plus आणि V10 Pro च्या किंमतीत मोठी कपात केली आहे. Vida V1 Plus च्या किंमतीत 25 हजारांची कपात करण्यात आलेली असून, V10 Pro 19 हजारांनी स्वस्त झाली आहे. किंमतीत कपात केल्यानंतर आता Vida V1 Plus 1 लाख 20 हजारात उपलब्ध असून, V10 Pro 1 लाख 40 हजार झाली आहे.


हिरो मोटोकॉर्पने किंमत वगळता स्कूटरमध्ये कोणताही बदल केलेला नाही. ग्राहक फक्त 499 रुपयांत ही स्कूटर बूक करु शकतात. 


या स्कूटर्समध्ये काय फिचर्स आहेत?


Vida V1 Plus मध्ये कंपनीने 3.44kWh क्षमतेचा बॅटरी पॅक दिला आहे. जो 1.72kWh च्या दोन बॅटरी सेटसह मिळत आहे. या रिमूव्हेबल बॅटरी असून गरजेनुसार तुम्ही त्या बदलू शकता. याची IDC रेंज 143 किमी असून रस्त्यावर ही स्कूटर सिंगल चार्जमध्ये 85 किमीपर्यंत प्रवास करु शकते. 124 किलोच्या या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये कंपनीने तीन रायडिंग मोड्स दिले आहेत. ज्यामध्ये इको, राइड आणि स्पोर्ट्स मोड आहे. दोन्ही स्कूटर्सच्या पॉवर आणि परफॉर्मन्सबद्दल बोलायचं गेल्यास यांचा टॉप स्पीड ताशी 80 किमी आहे. यामध्ये इलेक्ट्रिक मोटर 6kW चा पीक पॉवर आणि 25Nm चा टॉर्क जनरेट करते. 


V10 Pro मध्ये कंपनीने 3.94kWh च्या क्षमतेचा बॅटरी पॅक दिला आहे. याची IDC रेंज 165 किमी असून रस्त्यावर 95 किमीची ड्रायव्हिंग रेज देईल. ही स्कूटर 3.2 सेकंदात 0 वरुन थेट 40 किमीचा वेग पकडते असा कंपनीचा दावा आहे. याचा टॉप स्पीड ताशी 80 किमी आहे. 


दोन्ही स्कूटमधील बॅटरी फास्ट चार्जरमुळे फक्त 65 मिनिटांत 0 ते 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होते असा दावा आहे. तसंच बॅटरी फूल चार्ज होण्यासाठी 5 तास 15 मिनिटांचा वेळ लागतो. या स्कूटरमध्ये 7 इंचाचा टीएफटी टच डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले डार्क आणि ऑटो मोडवर येतो. तसंच LED प्रोजेक्टर हॅडलँप देण्यात आला आहे. यामध्ये ब्रेकिंगसाठी फ्रंटला डिस्क आणि मागे ड्रम ब्रेक देण्यात आला आहे.