मुंबई : मोबाईल कंपनी 'ऑनर'ने भारतीय बाजारात Honoe View 20 हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. ४८ मेगापिक्सल कॅमेरा हे या स्मार्टफोनचे वैशिष्ट्ये आहे. Honoe View 20 ३० जानेवारीपासून अॅमेझॉन तसेच कंपनीच्या अधिकृत वेबसाईट hihonor.in वर खरेदी करता येणार आहे. ६ जीबी+१२८ जीबी फोनची किंमत ३७,९९९ इतकी असून Sapphire Blue आणि Midnight Black या रंगात हा फोन उपलब्ध आहे. तर ८ जीबी+२५६ जीबी फोनची किंमत ४५,९९९ इतकी असून Phantom Blue रंगात उपलब्ध आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहेत Honoe View 20ची खास वैशिष्ट्ये -


- ६.४ इंच पंच होल डिस्प्ले 
- २५ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा, सेल्फी कॅमेरासाठी 3D टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे. या कॅमेराद्वारे स्लो मोशन व्हिडिओ कॅप्चर करण्याची सुविधा देण्यात आली आहे.
- ४००० एमएएच बॅटरी


- आर्टिफशिअल इंटेलिजेंसची सुविधा
- किरिन 980 चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. यामुळे फोनचा परफॉरमेंस चांगला राहण्यात मदत होते. 



गेल्या आठवड्यात पॅरिसमध्ये हा स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला होता. चीनमध्ये डिसेंबर २०१८ मध्ये Honoe View २० लॉन्च करण्यात आला होता.  'ऑनर'ने या स्मार्टफोनसह Honor band 4 चे खास एडिशन लॉन्च केले आहे. त्यासोबतच Honor watch magic बाजारात आणले आहे. या घडाळ्याला टचस्क्रिन देण्यात आला असून सात दिवसांपर्यंत चालेल इतका बॅटरी बॅकअप देण्यात आला आहे. Honor watch magic ची किंमत १३,९९९ इतकी आहे.