मुंबई : सध्या काही ठग्यांकडूंन लोकांना हॅकिंमच्या माध्यमातून फसवण्याचे धंदे सुरू आहेत. त्यामुळे अशी लोकं कुठे ही फसु नय़े म्हणून फेक किंवा बोगस कागद पत्रांचा वापर करु शकतात. अशा परिस्थितीते ते तुमच्या डॉक्यूमेंट्सच्या सहाय्याने किंवा तुमच्या नावावरती नवीन नंबर घेऊन एखाद्याची फसवणूक करु शकताता. ज्यामुळे तुम्ही या सगळ्यात अडकले जाऊ शकतात. असे तुमच्या सोबत होऊ नये, म्हणून तुमच्या डॉक्यूमेंट्सवर किती सिमकार्ड अॅक्टीव्ह आहेत हे तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर हे कसं शक्य होईल याची माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.


लोकांना फसवणुकीपासून वाचवण्यासाठी दूरसंचार विभागाने (DoT) अलीकडेच एक पोर्टल सुरू केले आहे, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या आयडीवर किती मोबाईल क्रमांक नोंदणीकृत आहेत हे शोधू शकाल.  आधार, पॅन किंवा व्होटर आयडी सारख्या तुमच्या आयडीवर किती मोबाईल सिम चालू आहेत, हे यामुळे सहज ट्रॅक करता येईल. 


डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्यूनिकेशनच्या (DoT) च्या या पोर्टलचे नाव टेलिकॉम ऍनॅलिटीक्स फॉर फ्रॉड मॅनेजमेंट ऍड कंज्यूमर प्रोटेक्शन (TAFCOP) आहे. हे काही राज्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ते चालवले जात आहे.


TAFCOP ने आपल्या वेबसाइटवर लिहिले आहे, 'ही वेबसाइट लोकांच्या मदतीसाठी आहे. याद्वारे, लोक त्यांच्या आयडीवर किती मोबाईल कनेक्शन चालू आहेत, हे शोधू शकतील आणि मग तुम्ही त्यानुसार कारवाई करू शकाल.'


सर्वप्रथम TAFCOP पोर्टल https://tafcop.dgtelecom.gov.in/ वर जा. एक पेज तुमच्या समोर उघडेल, जिथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल.


त्यानंतर तुम्ही OTP बटणावर क्लिक करा. यानंतर तुमच्या नंबरवर एक OTP येईल. ओटीपी टाकल्यानंतर तुमच्या आयडीवरून चालणारे सर्व मोबाईल नंबर तुमच्या समोर येतील.


आपण वापरत नसलेल्या नंबरसाठी चेक बॉक्सवर क्लिक करा किंवा टॅप करा आणि हा माझा नाही टॅप करा. जर नंबर आवश्यक नसेल, तर आवश्यक नाही वर क्लिक करा. जर तुमच्याकडे सर्व नंबर असतील तर तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही.