Pan Card Update: मुंबई (Mumbai) ही देशाची आर्थिक राजधानी आहे. शहरात दिवस-रात्र आर्थिक व्यवहार होत असतात. आर्थिक व्यवहार वाढल्याने त्याचबरोबर सायबर क्राइमदेखील (Cyber Crime) वाढले आहेत. सायबर क्राइमला आळा घालण्यासाठी सरकारकडून अनेकदा सावध केले जाते. त्याचरोबर अनेक उपायही राबवल्या जातात. आपल्या देशात आर्थिक व्यवहार करण्यासाठी १८ वर्षांवरील नागरिकांना पॅन कार्ड (Pan Card) जारी करण्यात येते. आयकर विभागाकडून (Income Tax) पॅन कार्ड जारी करण्यात येते. पॅन कार्डवर असलेले आकडे हे प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. बऱ्याचदा महत्त्वाच्या कामासाठी पॅनकार्डचा वापर होतो. पण तुम्हाला हे माहितीये का तुमच्या पॅनकार्डचा गैरवापरदेखील होऊ शकतो. (Pan Card Fraud) अशावेळी तुमच्या पॅनकार्डचा कोणाकडून गैरवापर करत आहे हे तुम्ही आता तपासू शकता. 


या गोष्टींची काळजी घ्या


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्हाला असं वाटत असेल की पॅन कार्डचा चुकीच्या पद्धतीने वापर होतोय तर अशावेळी तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेण्याची गरज आहे. तुम्ही दररोज तुमचा फायनान्स रिपोर्ट तपासा, बँक स्टेटमेंट, बिल इत्यादी तपासत चला. यात काही फेरफार तर नाहीये ना याची खातरजमा करुन घ्या. प्रत्येक बँक स्टेटमेंट लक्ष देऊन तपासा. 


तुमची साडेसाती सुरू आहे?; शनि जयंतीचा मुहूर्त आहे तुमच्यासाठी खास, या गोष्टी करा दान


सिबिल स्कोर


बँक स्टेटमेंटबरोबरच तुमचा सिबील स्कोरही वेळच्यावेळी तपासा. सिबील स्कोरमध्ये तुम्ही घेतलेले कर्ज व क्रेडिट कार्डबाबत माहिती मिळेल. तुमच्या पॅन कार्डचा वापर करुन कोणी क्रेडिट कार्ड घेतलंय किंवा लोन काढलंय का सिबील स्कोरच्या माध्यमातून माहिती मिळेल. त्याचबरोबर तुमचे इनकम टॅक्स अकाउंटदेखील चेक करत राहावे. 


मंगलाष्टक सुरू होत्या, इतक्यात नातेवाईकांनी नवरीला असं काही सांगितले की तिने थेट लग्नच मोडले


काय काळजी घ्याल?


चुकीच्या किवा फसव्या वेबसाइटवर तुमच्या पॅनकार्डमध्ये दिलेला क्रमांक वापरु नका, आधी त्या वेबसाइटची खातरजमा करा. तसंच, अत्यावश्यक असल्यास इतर दस्तावेजाची माहिती द्या. उदा. ड्रायव्हिंग परवाना, व्होटर आयडी.


तुमच्या पॅनकार्डच्या झेरॉक्सची पत फक्त अधिकृत व्यक्ती व ओळखीच्या लोकांनाच द्या.


अनधिकृत साइटचा वापर करत असताना तुमचं पूर्ण नाव आणि जन्मतारीख टाकू नका. कारण त्याचा वापर करुन तुमचे पॅन कार्ड ट्रेस होऊ शकते. 


शेजाऱ्याची आईवर होती वाकडी नजर, मुलाला खबर लागली, घडवली जन्माची अद्दल



इथे तक्रार करा


दरम्यान, कोणी तुमच्या पॅन कार्डवरुन काही आर्थिक व्यवहार केले असतील तर त्वरित तुमच्या बँकेला याची माहिती द्या. त्याचबरोबर पोलिसांकडे तक्रार करा. त्याशिवाय आयकर विभागाला याची माहिती द्या. तक्रार दाखल केल्यानंतर विभागाकडून अत्यावश्यक कारवाई सुरू करण्यात येईल.