शेजाऱ्याची आईवर होती वाकडी नजर, मुलाला खबर लागली, घडवली जन्माची अद्दल

Man Fired At Neighbour For Molesting Mother: शेजाऱ्याने आईसोबत सलगी केली. भडकलेल्या तरुणाने त्याला घडवली जन्माची अद्दल 

Updated: May 18, 2023, 05:49 PM IST
शेजाऱ्याची आईवर होती वाकडी नजर, मुलाला खबर लागली, घडवली जन्माची अद्दल title=

Crime News: शेजाऱ्याची आईवर होती वाकडी नजर (Molesting) मुलाला याची खबर लागली (Crime). मग संतापाच्या भरात मुलाने आईवर वाईट नजर ठेवणाऱ्या व्यक्तीची गोळ्या झाडल्या.  उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) सुल्तानपूर येथे ही घटना घडली आहे. सध्या आरोपी फरार असून पोलिसांनी तीन ते चार जणांना ताब्यात घेतलं आहे. 

महिलेसोबत सगली करायचा

मिळालेल्या माहितीनुसार, एक युवक सातत्याने आरोपीच्या आईसोबत सलगी करण्याचा प्रयत्न करायचा. कित्येकदा विरोध करुनही त्याने तिचा पाठलाग करणे सोडले नाही. हा सर्व प्रकार आरोपीला समजताच त्याला राग अनावर झाला. रागाच्या भरात त्याने शेजाऱ्याला संपवण्याचे ठरवले. त्यानुसार त्याने प्लानिंग करत मित्रांनाही यात सामील करुन घेतले. 

तरुण दबा धरुन बसले होते

जगदीश दुबे असं हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. घरातून शौचालयाकडे जात असताना गावातील गावातील दोन तीन तरुण तिथेच दबा धरुन बसले होते. जगदीश येताच त्यांनी छातीवर डाव्या बाजूला गोळ्या चालवल्या, अशी तक्रार जगदीशच्या वहिनीने पोलिसांत दाखल केली आहे. जगदीशवर गोळ्या झाडल्यानंतर त्याला सार्वजनिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र त्याची अवस्था नाजूक असल्याने त्याला डॉक्टरांनी पुढे पाठवण्याचा सल्ला दिला. मात्र, तिथेही त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगत लखनौ ट्रामा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. 

मंगलाष्टक सुरू होत्या, इतक्यात नातेवाईकांनी नवरीला असं काही सांगितले की तिने थेट लग्नच मोडले

 

दोन जणांवर गुन्हा दाखल

प्रती दुबे आणि धर्मेंद्र दुबे यांच्या तक्रारीवरुन दोन जणांवर तक्रार दाखल करण्यात आली आहे. जीवे मारण्याचा प्रय़त्न व शिवीगाळ केल्याच्या आरोपाखाली दोघा जणांविरोधात गुम्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यां तरुणांवर गुन्हा दाखल झाला आहे त्याच्या आईसोबत जगदीशने गैरव्यवहार केल्यामुळं त्याने रागच्या भरात गुन्हा केल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. दरम्यान, पोलिस फरार आरोपींचा शोध घेत असून या घटनेच्या अनुषंगाने चार जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. लवकरच या प्रकरणी कठोर कारवाई करण्यात येईल, असं पोलिसांनी म्हटलं आहे. 

माहिला मांत्रिकाचा सल्ला ऐकला, मित्राला फसवण्याचा कट रचला पण झालं उलटच, दोघांना घडली तुरुंगवारी