मुंबई  : जगप्रसिद्ध सोशल मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपचे लाखो-करोडो युझर्स आहेत. हे व्हॉट्सअ‍ॅप तुम्हाला प्रत्येक स्मार्टफोनमध्ये मिळेलच इतके ते प्रसिद्ध आहे. व्हॉट्सअ‍ॅपवरून तुम्हाला आपल्या मित्र-मैत्रिणींना, कलिगना व्हिडिओ कॉलिंगसह मजकूर संदेश, फोटो, व्हिडिओ, ऑडिओ फाइल्स पाठवता येत असतात. हे व्हॉट्सअ‍ॅप अनेकदा दुसरा कोणीतरी वाचत असल्याचा आपल्याला संशय येतो. जर तुम्हालाही असं वाटतं असेल तर खालील दिलेल्या या सोप्या टिप्य वाचून ते शोधा.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हॉट्सअ‍ॅपवर तुमचे वैयक्तिक चॅट्स कोणीतरी वाचतयं ? असा जर संशय तुम्हाला आला तर तुमचे व्हॉट्सअॅप चॅट्स एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड आहेत, मग तुमचे चॅट्स कोणीतरी कसे वाचत असेल, असेही तुम्हाला वाटतं असेल. पण अनेकदा तसे नसते. युझरच्या एका चुकीमुळे हे चॅट्स वाचता येऊ शकतात. 


व्हॉट्सअ‍ॅप वेब म्हणजे काय? 
अनेक ऑफिसेसमध्ये व्हॉट्सअ‍ॅप कामासाठीही वापरले जाते. हे व्हॉट्सअ‍ॅप Computer वर उघडण्यासाठी आपण WhatsApp Web या पर्यायाचा वापर करत असतो. हे व्हॉट्सअ‍ॅप वेब आपण Desktop किंवा Laptop वर वापरू शकतात.हा पर्याय आपल्या फोनमधल्या व्हॉट्सअ‍ॅपमध्येच दिलेला असतो. 


व्हॉट्सअ‍ॅप वेब हा फिचर्स ज्यावेळेस आपण आपल्या Computer वर ओपन करतो. त्यावेळेच तुम्हाला पुन्हा पुन्हा लॉग इन करण्याची गरज भासत नाही. एखाद्या वेळेस तुमचा फोन चुकून कोणाच्या हाती लागला आणि त्यात पासवर्ड नसेल तर तो व्हॉट्सअ‍ॅप Computer वर लॉग इन करून तुमचे मेसेज वाचू शकतो. 


'या' सेटींगद्वारे कळणार ? 
तुम्हाला जर एखादा व्यक्ती तुमचे मेसेज वाचत असल्याचा संशय असेल तर WhatsApp वर जाऊन Linked Device वर जाऊन चेक करा. या पर्यायात किती डिवाईसवर तुमचं WhatsApp कनेक्ट आहे, याची माहिती मिळणार आहे. जर तुम्ही Log In न केलेल्या ठिकाणी तूमचं डिवाई दिसत असेल तर त्वरीत त्यातून बाहेर या. हा एक सोपा पर्याय आहे. चोरीने मेसेज वाचणाऱ्यांचा छडा लावण्याचा, त्यामुळे तुम्ही हा पर्याय वापरून पहा.