How To Download YouTube Shorts Video: प्रत्येकाच्या हाती आपल्याला स्मार्टफोन पाहायला मिळतो. नव्या पिढीसोबत जुन्या पिढीच्या लोकांनीही स्मार्टफोन कसा हाताळायचा, हे आत्मसात केलं आहे. त्यामुळे सोशल मीडिया वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर नवनवे ट्रेंड येत आहेत. टिकटॉकवर बंदी आणल्यानंतर इन्स्टाग्राम रिल्स (Instgram Reels) आणि यूट्युब शॉर्टनं (YouTube Shorts) त्याची जागा घेतली आहे. अल्पावधीतच यूट्युब शॉर्ट आणि इन्स्टा रील पॉप्युलर झालं आहे. या प्लॅटफॉर्मवर युजर्स रोजच्या रोज क्रिएटिव्ह व्हिडीओ पोस्ट करत असतात. काही युट्यूब व्हिडीओ पाहिल्यानंतर डाउनलोड करून आणि व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला (WhatsApp Status) ठेवण्याची इच्छा होते. सध्या तुमच्याकडे यूट्युब शॉर्ट्स व्हिडीओ लिंक करण्याचा पर्याय आहे. मात्र काही सोप्य स्टेप्सच्या मदतीने हा व्हिडीओ डाउनलोड करून व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला ठेवू शकता. यूट्युब शॉर्ट व्हिडीओ व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला ठेवण्यासाठी सोप्या पद्धतीने डाउनलोड करू शकता. आज आम्ही तुम्हाला याबाबत सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊयात..


YouTube Shorts Video असा डाउनलोड कराल 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर तुम्ही अँड्रॉईड यूजर असाल तर सर्वात आधी यूट्युब अ‍ॅपवर या. त्यानंतर डाउडलोड करायचा आहे तो शॉर्ट व्हिडीओ सिलेक्ट करा. शेअर लिंक वर क्लिक करा आणि URL कॉपी करा. शॉर्ट व्हिडीओ डाउनलोड करण्यासाठी Shortsnoob.com वर जा. हे अ‍ॅप प्ले स्टोरवर आहे. कॉपी केलेली URL इथे पेस्ट करा आणि सर्च बटणावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन मिळेल. तिथे क्लिक केल्यानंतर आपल्या आवडीचा व्हिडीओ डाउनलोड होईल.


बातमी वाचा- YouTube कधी होती डेटिंग साइट! नोकियासह या कंपन्यांनी केली अशी सुरुवात जाणून घ्या 


WhatsApp Status वर असं शेअर कराल


व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला तुम्ही यूट्युब शॉर्ट्स व्हिडीओ लावू शकता. यासाठी सर्वप्रथम व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस ऑप्शनवर क्लिक करा. यानंतर + या ऑप्शनवर क्लिक करा. यानंतर यूट्युब शॉर्ट्स डाउनलोड केलेला व्हिडीओ सिलेक्ट करून अपलोड करा. या पद्धत फॉलो करून तुम्ही तुमचा आवडता व्हिडीओ व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला ठेवू शकता.