YouTube कधी होती डेटिंग साइट! नोकियासह या कंपन्यांनी केली अशी सुरुवात जाणून घ्या

कंपनी नावारुपाला आली की त्याची उत्पादनं जगभर प्रसिद्ध होतात. अनेक कंपन्यांनी सुरुवात वेगळ्या प्रोडक्टनं केली. मात्र आज या कंपन्या वेगळ्याच प्रोडक्टसाठी ओळखल्या जातात. यूट्यूब, नोकिया यासह इतर कंपन्यांनी वेगळं प्रोडक्ट सुरु केलं होतं. मात्र आज वेगळी ओळख निर्माण केली आहे. चला तर जाणून घेऊयात

Nov 20, 2022, 21:41 PM IST
1/5

Nokia, Colgate, Youtube, Amazon, Netflix

1994 मध्ये ई-कॉमर्स क्षेत्रातील जगातील सर्वात मोठी कंपनी Amazon लाँच झाली. तेव्हा ही कंपनी त्यावर फक्त पुस्तके विकत होती. पण काळानुसार बदल झाला आणि आजच्या काळात जवळपास सर्वच वस्तू त्यावर विकल्या जात आहेत.

2/5

Nokia, Colgate, Youtube, Amazon, Netflix

प्रत्येक घराघरात टूथपेस्टसाठी प्रसिद्ध असलेल्या कोलगेटची सुरुवात साबण आणि मेणबत्तीपासून झाली. ही कंपनी 1806 मध्ये सुरू झाली होती. मात्र 1873 पासून टूथपेस्ट बनवायला सुरुवात केली.

3/5

Nokia, Colgate, Youtube, Amazon, Netflix

YouTube आजच्या काळात व्हिडीओसाठी सर्वात लोकप्रिय साइट आहे. मात्र 2005 मध्ये डेटिंग साइट म्हणून लाँच झाली होती. या साईटवर लोक आवडीच्या जोडीदाराबद्दल सांगणारे व्हिडिओ अपलोड करायचे.

4/5

Nokia, Colgate, Youtube, Amazon, Netflix

Netflix, जगभरातील सर्वात लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्मपैकी एक आहे. मात्र असं असलं तरी सुरुवातीला कंपनी मेलद्वारे डीव्हीडी भाड्याने देत असे. त्यानंतर बाजारपेठेतील संधी पाहून ऑनलाइन स्ट्रीमिंगमध्ये प्रवेश केला.

5/5

Nokia, Colgate, Youtube, Amazon, Netflix

मोबाईल फोनसाठी प्रसिद्ध असलेली नोकिया कंपनीची सुरुवात पेपर मिल म्हणून झाली. यानंतर कंपनीने पेपर, रबर, टायर्ससह इतर अनेक उत्पादनांमध्ये हात आजमावला. मात्र मोबाइल फोनच्या व्यवसायात तिला सर्वाधिक यश मिळाले. एकेकाळी नोकियाचा भारतातील मोबाईल फोन क्षेत्रात दबदबा होता.