ChatGPT ने घरबसल्या तुम्ही पण होऊ शकता कोट्यधीश, `हे` आहेत दोन पर्याय
Make Money With AI: जॅट जीटीपी अल्पावधीतच लोकप्रिय झाले आहे. सध्या सगळीकडे त्याच्याच चर्चा आहेत. मात्र, चॅटजीटीपीमुळं तुम्ही पैसेदेखील कमावू शकता, कसे ते पाहा
ChatGPT Uses: चॅट जीटीपी (ChatGPT) आता दुसरं गुगल म्हणून उदयास येत आहे. AI (Artificial Intelligence) घराघरात पोहोचले आहे. AIमुळं लोकांची कामं सोप्पी झाली आहेत. सेल्फ मेड मिलियनेअर, इनव्हेस्ट फर्मचे सीईओ इतकेच नव्हे तर अमेरिका शार्क टँकचे स्टार गेस्ट मॅट हिंगिंस यांनीही याबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने माणसाच्या बुद्धीप्रमाणेच काम केले जाते. या तंत्रज्ञानावर आधारीत मशीन माणसासारखे बोलू शकते व वाचू शकते. याच तंत्रज्ञानाचा एख भाग चॅट जीटीपी आहे. जॅट जीटीपी हा गुगलला दुसरा पर्याय आहे, असंही म्हटलं जातं. याच चॅट जीटीपीच्या माध्यमातून तुम्ही घरबसल्याही पैसे कमावू शकता. कसं ते आज जाणून घेऊया.
चॅट जीटीपीच्या माध्यमातून तुम्ही दोन पर्यायाने पैसे कमावू शकता. त्याचबरोबर एआय ट्युशनच्या माध्यमातूनही तुम्ही पैसे कमावू शकता. मात्र अद्याप या पर्यायची अद्याप प्रगती झाली नाहीये. लवकरच हा पर्यायही उपलब्ध होणार आहे. त्यापूर्वी इतर दोन पर्याय जाणून घेऊयात.
फ्रीलान्स (Freelance)
तुम्हाला लिखाणाची, ग्राफिक डिजाइन किंवा फोटो आणि व्हिडिओ एडिट करण्याची आवड आहे का. आता तुमचे हेच कौशल्य वापरुन तुम्ही चॅट जीटीपीआयच्या माध्यमातून बंपर कमाई करु शकता. AI तुम्हाला बिझनेस प्लान किंवा डिजीटल आर्टवर्क तयार करण्यास मदत करु शकतात. मात्र हे करत असताना तुम्ही AI Tool वापरुन लिहलेले शब्द किंवा पिक्सेल प्रुफरीड किंवा एकदा वाचून घ्या आणि भाषेत बद करा. जेणेकरुन लिखाण एखाद्या व्यक्तीने केले असे वाटेल. अन्यथा एका रोबोटने लिहल्याचा अभास होईल.
Entrepreneurship
स्टार्ट अपच्या माध्यमातून उद्योजक बनण्याचे स्वप्न पाहणारे Entrepreneur एआयच्या माध्यामतून आभ्यास करु शकतात. कंपनीचा नफा कसा वाढवता येईल यासाठी काही गोष्टी समजून घेता येतील. एआय तुमच्या छोट्या-छोट्या गोष्टींच्या मदतीसाठी धावून येईल. खासकरुन जे आत्ताच उद्योगक्षेत्रात उतरले आहेत. AIच्या मदतीने ते बिझनेसमधील बारकावे शिकता येतील.
AIची निर्मिती कशी झाली?
वेगाने वाढणाऱ्या AIची निर्मिती कशी झाली याबाबत तुमच्याही मनात प्रश्न आहेत का? जॉन मॅककार्थी यांनी १९५६ साली आर्टिफिशल इंटेलिजन्स चा शोध लावला. पण मिळालेत्या माहितीनुसार जेफ्री हिंटन यांना AI चे गॉडफादर म्हणून ओळखतात. आज अनेक क्षेत्रात AIचा वापर होतो. स्मार्टफोनमध्येही आर्टिफिशल इंटेलिजन्सचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे याचे काम चालते