बातमी तुमच्या कामाची : घरबसल्या अशी ट्रान्सफर करा एसबीआय ब्रान्च
ब्रान्च ट्रान्सफरसाठी तुम्ही चार गोष्टींची पूर्तता केलेली असायला हवी...
मुंबई : जर तुम्ही एसबीआय बँकेचे ग्राहक आहात... आणि तुम्हाला तुमचं अकाऊंट एका ब्रान्चमधून दुसऱ्या ब्रान्चमध्ये ट्रान्सफर करायचं असेल तर हे काम तर अगदी सोप्पं आहे. आता घरबसल्या ऑनलाईन पद्धतीनं तुम्ही एसबीआयची ब्रान्च एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करू शकता. याअगोदर यासाठी अनेक फॉर्म भरावे लागत होते परंतु, नेट बँकींगमुळे हे काम अगदी सोप्पं आहे. केवळ आठवड्याभरात तुम्ही हे काम पूर्ण करू शकता.
ट्रान्सफर करण्यापूर्वी तुम्हाला ज्या ब्रान्चमध्ये ट्रान्सफर करायचंय त्या ब्रान्चचा कोड माहीत करू घ्या. फोनवरून किंवा ऑनलाईनही तुम्ही हा कोड माहीत करून घेऊ शकता. ब्रान्च ट्रान्सफरसाठी तुम्ही या चार गोष्टी पूर्ण केलेल्या असायला हव्यात...
या गोष्टींची करा खातरजमा
- हा पर्याय केवळ सेव्हिंग अकाऊंटसाठी खुला आहे
- यासाठी तुम्ही केवायसी पूर्ण केलेली असायला हवी
- ब्रान्च ट्रान्सफरसाठी तुमचा मोबाईल क्रमांकही रजिस्टर असायला हवा
- तुमच्याकडे नेट बँकिंगची सुविधा असायला हवी
असं करा तुमचं अकाऊंट ट्रान्सफर
- www.onlinesbi.com वर जाऊन पर्सनल बँकिंगमध्ये युझरनेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा
- e services च्या ऑप्शनवर क्लिक करा
- त्यानंतर Transfer of savings account वर क्लिक करा
- त्यानंतर तुम्हाला आपला अकाऊंट क्रमांक आणि ब्रान्च दिसेल. तुमच्याकडे एकाहून अधिक अकाऊंट असतील तर ट्रान्सफर करणार अकाऊंट निवडा
- तुम्हाला ज्या ब्रान्चमध्ये ट्रान्सफर करायचंय त्याचा नमूद केल्यानंतर तुम्हाला ब्रान्चचं नाव समोर दिसेल. त्यावर क्लिक करून कन्फर्म करा
- त्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल... तो नोंदवा...
त्यानंतर तुमचा अकाऊंट नंबर ट्रान्सफरसाठी रजिस्टर होईल आणि पुढच्या एका आठवड्याच्या आता तुमची ब्रान्च ट्रान्सफर होईल. तुमचा अकाऊंट क्रमांक आणि CIF क्रमांक तोच राहील परंतु, IFSC कोड मात्र बदलेल.