मुंबई : चायनीज मोबाईल कंपनी हुआवेई ने इंडियन मार्केटमध्ये दोन नवे स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. पी20 प्रो (Huawei P20 Pro) आणि प्रो 20 लाईट (P20 Lite) हे दोन फोन भारतीय बाजारात सादर केले. याची खासियात म्हणजे Huawei P20 Pro मध्ये तीन रिअर कॅमेरे आणि  P20 Lite मध्ये दोन रिअर कॅमेरे आहेत. दोन्ही स्मार्टफोन्समध्ये व्हू डिस्पले आहे. हे दोन्ही फोन अॅनरॉईड ओरिओवर चालतात.
Huawei P20 Pro हा कंपनीचा फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे ज्यात iPhone 8 आणि गॅलेक्सी एस9 सारखे फिचर्स आहेत. जाणून घेऊया फिचर्सबद्दल...


डिस्प्ले


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Huawei P20 Pro मध्ये  6.10 इंचाचा 1080x2240 पिक्सल रिजोल्यूशनचा फुल एचडी डिस्प्ले आहे. फोनच्या फ्रंट पॅनलवर आयफोन X सारखे नॉच दिले आहे. त्यामुळे याचा लूक जबरदस्त दिसत आहे. तर P20 Lite मध्ये 1080x2280 पिक्सल रिजोल्यूशनचा 5.84 इंचाचा डिस्प्ले आहे. हा फोन अॅनरॉईड 8.0 वर काम करतो.


कॅमेरा


हुआवेई पी20 प्रो च्या मागील भागात ३ कॅमेरे आहेत. सर्वात वरती 8 मेगापिक्सलचा सेंसर आहे. यात 3X ऑप्टिकल झूम असलेला लाईका टेलीफोटो लेन्स आहे. तर दुसरा 40 MP आणि तिसरा  20 MP चा कॅमेरा आहे. यात 24 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आाला आहे. तो पी20 लाईटच्या रिअर कॅमेऱ्यात दोन कॅमेरे दिले आहेत. याचे प्रायमरी सेंसर 16 MP आहे. तर सेकंडरी कॅमेरा 2 मेगापिक्सलचा आहे. तर 24 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.


रॅम आणि मेमरी


हुआवेई पी20 प्रो मध्ये 6 GB ची रॅम आहे. या फोनचे इंटरनर स्टोरेज 128 GB आहे. Huawei P20 Lite किरिन 659 प्रोसेसरसोबत 4 GB रॅम देण्यात आली आहे. याची इंटरनल मेमरी  64 GB आहे. गरज असल्यास मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने 256 GB पर्यंत वाढवता येईल.


बॅटरी


हुआवेई P20 Pro मध्ये 4000 mAH ची बॅटरी आहे. या फोनची बॅटरी हुआवेई सुपरचार्ज फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. या फोनमध्ये 1.8 गीगा हर्टजचा ऑक्टाकोर प्रोसेसर आहे.  पी20 लाईटमध्ये 3,000 mAh ची बॅटरी आहे. यात कंपनीने ऑक्टाकोर प्रोसेसरचा वापर केला आहे.



किंमत आणि लॉन्च ऑफर


हुआवेई  P20 Pro ची किंमत 64,999 रुपये आहे. तर हुआवेई पी20 लाईटची किंमत 19,999 रुपये आहे. दोन्हीही स्मार्टफोनची विक्री अॅमेझॉनवर ३ मे पासून सुरु होईल. P20 Pro ब्लॅक आणि मिडनाईट ब्लू रंगात मिळेल. तर पी20 लाईट ब्लॅक आणि ब्लू रंगात उपलब्ध होईल. लॉन्च ऑफरचा खुलासा विक्रीच्या दिवशी ३ मे ला अॅमेझॉनवर केला जाईल, असे कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे.